कुटुंबाच्या कर्मामुळे सलमान जगतोय असं आयुष्य…, प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा

Salman Khan Life: सलमानच्या आयुष्यात जे काही होत आहे, ते कुटुंबाचे कर्म..., भाईजानकडे पैसा, संपत्ती असूनही असं का म्हणाला प्रसिद्ध अभिनेता? सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

कुटुंबाच्या कर्मामुळे सलमान जगतोय असं आयुष्य..., प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Jul 18, 2025 | 1:37 PM

Salman Khan Life: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. फक्त सलमान खानच नाही तर, संपूर्ण खान कुटुंब कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. शिवाय इंडस्ट्रीमधील अनेकांसोबत खान कुटुंबाचे संबंध देखील फार चांगले आहेत. खान कुटुंबाबद्दल अनेक सेलिब्रिटींनी स्वतःचं मत माडलं आहे. एका मुलाखतीत अभिनेते किरण कुमार यांनी देखील सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

किरण कुमार एका मुलाखतीत खान कुटुंबाबद्दल म्हणाले होते, ‘फार क्वचित खान कुटुंबासारखं कुटुंब कोणाला मिळेल. म्हणजे इतकं चांगलं कुटुंब तुम्हाला क्वचितच कुठे पाहायला मिळेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्यात फक्त प्रेमाची भावना आहे. सलमा आपापासून लहान मुलांपर्यंत… संपूर्ण कुटुंब कमाल आहे…’

 

 

‘सलमान खान याच्यासोबत आज जे काही होत आहे, ते फक्त आणि फक्त खान कुटुंबाच्या कर्माचं फळ आहे. कुटुंबामुळेच सलमान आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते आहेत पण सलमान सारखा दुसरा कोणता हिरो नाही. यामागे सलीम खान याचा खारीचा वाटा आहे…’ असं देखील किरण कुमार म्हणाले…

पुढे एक आठवण सांगत किरण म्हणाले, ‘एकदा रात्री 2 वाजता शुटिंग संपवून घरी जात होतो. तेव्हा वांद्रे येथील बिंग ह्यूमन स्टोरसमोर सलमान आणि सलीम खान यांचा मोठा पोस्टर लावलेला होता. पोस्टर पाहिल्यानंतर सतत त्यांचे आभार मी मानले होते… ‘ सध्या सर्वत्र किरण कुमार यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.

सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता वयाच्या 60 व्या वर्षी देखील मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. टायगर 3 नंतर, सलमान खान 2025 मध्ये सिकंदर सिनेमात दिसला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फेल ठरला. आता सलमान त्याच्या आगामी सिनेमावरलक्ष केंद्रित करत आहे. या सिनेमाचं नाव आहे बॅटल ऑफ गलवान, ज्यामध्ये सलमान एका सैनिकाची भूमिका साकारणार आहे.