AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर

प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते. काही सकारात्मक स्पर्धा असतात, तर काही स्पर्धा आसूयेतूनही होत असतात. गायिका वैशाली शिंदे यांनाही असेच हितचिंतक लाभले. (know about well known singer vaishali shinde)

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही 'ही' गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर
vaishali shinde
| Updated on: May 12, 2021 | 4:52 PM
Share

मुंबई: प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असते. काही सकारात्मक स्पर्धा असतात, तर काही स्पर्धा आसूयेतूनही होत असतात. गायिका वैशाली शिंदे यांनाही असेच हितचिंतक लाभले. वैशाली शिंदेंनी घराचा पत्ता बदलल्यापासून ते त्यांनी गाणं गाण्याचं सोडून दिल्यापर्यंतच्या अनेकांनी अफवा पसरविल्या. पण वैशाली शिंदे डगमगल्या नाहीत. त्यांनी आल्या प्रसंगांना धीराने तोंड देत आपली स्वरसाधना सुरूच ठेवली. काय घडलं नेमकं? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (know about well known singer vaishali shinde)

पहिला सामना… 1982

वैशाली शिंदे या घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजमध्ये राहतात. या ठिकाणीच त्यांचा 1982मध्ये पहिला सामना झाला. गायक विठ्ठल गायकवाड यांच्या विरोधात त्यांचा पहिला सामना होता. या पहिल्याच सामन्यामुळे भीड चेपल्याने त्यांनी गावोगावी जाऊन कार्यक्रम केले. पती प्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्यासोबत त्यांनी गावोगावी भीम गीतांचे कार्यक्रम केले. कार्यक्रमानिमित्त त्या दोन दो चार चार महिने मुंबईबाहेरच असायच्या. त्यामुळे मुलांची अबाळ व्हायची. परंतु, गायकी हा पेशा असल्याने आणि त्यातून समाज प्रबोधनही होत असल्याने त्यांनी मुलांचीही पर्वा केली नाही.

मुलगा असता तर…

वैशालीताईंचं त्यांची आई सरुबाई यांच्यावर विशेष प्रेम होतं. त्यांची आई त्यांच्या बहुतेक कार्यक्रमांना हजर असायची. मुलीचा कार्यक्रम पाहून त्या समाधानी व्हायच्या. डोळ्यातून आनंदाश्रू व्हायचे. माझी मुलगी मुलगा असता तर तिने लौकीक मिळवला असता, असं त्या म्हणायच्या. वैशाली ताई या प्रत्येक गोष्टीत त्यांच्या आईचा सल्ला घ्यायच्या. त्यांची आई त्यांच्यासाठी मानसिक आधार होत्या.

हजारो गाणी, पुष्कळ पुरस्कार

वैशालीताईंनी वैशाली आणि पार्टी ही त्यांच्या गाण्याची स्वतंत्र पार्टी काढली होती. त्यांनी आजवर हजारो गाणी गायली. कवी लक्ष्मण राजगुरू, गोविंद गाडे, ज्ञानेश पुणेकर आणि विशाल शिंदे यांची सर्वाधिक गाणी त्यांनी गायली आहे. तर रमेश घरत हे त्यांचे लोकगीतांचे कवी आहेत. महाकवी वामनदादा कर्डक आणि लक्ष्मणदादा केदार यांची गाणीही त्यांनी गायली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पुण्यातील माजी नगरसेवक दयानंद राजगुरु यांनी त्यांना जन्मशताब्दी पुरस्कार देऊन गौरविले आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेनेही 2007मध्ये त्यांचा सन्मान केला. मंत्रालय वार्ता दैनिकाचे संपादक अनिल अहिरे यांनी त्यांना कलाभूषण पुरस्कार देऊन गौरवले आहे.

अफवा पसरविल्या

त्यांच्याबद्दल अनेकांनी अनेक अफवा पसरविल्या होत्या. वैशाली शिंदे घाटकोपरमध्ये राहत नाहीत. त्यांनी गाणं गायचं सोडून दिलं इथपासून ते त्यांचा आवाज बसल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे त्यांना काही कार्यक्रमांना मुकावे लागले. मात्र, या नुसत्याच अफवा असल्याचे लोकांच्याही लक्षात आले. त्यानंतर त्या पुन्हा जोमाने उभ्या राहिल्या. (know about well known singer vaishali shinde)

वैशाली शिंदेंची गाणी

जीवनातल्या तुझ्या सावलीची नको दुर्दशा करू माऊलीची !!धृ!! जगाला जरी तू वाटशील द्वाड, परि तुझ्या आईला तू मधाहून गोड, ममता आहे ती कोमल फुलाची…

आणि

आवड याची याला आवडली कशी, चावऱ्या या पोपटाला हा पडलाय फशी, चावणाऱ्या याच्या पोपटाला आता, स्वर्गाला धाडिते, याच्या नवीन पोपटाची, आता मुंडीच मोडिते…

आणि

देशावासियों जागते रहो, बाबा भीमजीके संविधान को पहचानलो, बोलो जयभीम बोलो…

आणि

घर कौलारू दुरून दिसतं, बघणाऱ्यांच्या मनात ठसतं, अंगणात पिंपळाचं झाडं, माझं माहेर नदीच्या पल्याड… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about well known singer vaishali shinde)

संबंधित बातम्या:

वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?

गाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?

शाळेत असतानाच आडनाव टाकलं, चार हजारांवर गाणी गायली; ‘या’ गायिकेबद्दल माहीत आहे का?

(know about well known singer vaishali shinde)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.