शाळेत असतानाच आडनाव टाकलं, चार हजारांवर गाणी गायली; ‘या’ गायिकेबद्दल माहीत आहे का?

दलित समाजाचं प्रबोधन करण्यात अनेक हात लागले आहेत. या प्रबोधनाच्या चळवळीत विविध जातीधर्माचे लोक, संत, राजकीय नेते आणि गायक मंडळींचा मोठा वाटा आहे. (know about nanda nandrekar journey, how she became singer)

शाळेत असतानाच आडनाव टाकलं, चार हजारांवर गाणी गायली; 'या' गायिकेबद्दल माहीत आहे का?
nanda nandrekar
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 1:32 PM

मुंबई: दलित समाजाचं प्रबोधन करण्यात अनेक हात लागले आहेत. या प्रबोधनाच्या चळवळीत विविध जातीधर्माचे लोक, संत, राजकीय नेते आणि गायक मंडळींचा मोठा वाटा आहे. आंबेडकरी गायकांनीही ही चळवळ नेटाने पुढे नेली. भीमराव कर्डकांपासून ते आजच्या गायकांपर्यंत ही चळवळ सुरूच आहे. नंदा नांद्रेकर सुद्धा याच प्रबोधनाच्या चळवळीतील शिलेदारांपैकी एक आहेत. गायिका म्हणून नंदा नांद्रेकर यांची जडणघडण कशी झाली? त्याचा घेतलेला हा आढावा. (know about nanda nandrekar journey, how she became singer)

आडनाव टाकलं

जळगाव जिल्ह्यातील मायजी (नांद्रे) हे नंदा नांद्रेकर यांचं मूळगाव. तर आंबेडकर नगर, चोपडा, उल्हासनगर ही त्यांची कर्मभूमी. त्या लहान असतानाच नंदा नांद्रेकर यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्या वडिलांचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. नंदा नांद्रेकर यांचं मूळ नाव नंदा लक्ष्मण बनकर आहे. पण शाळेतील सहकारी त्यांना बनकर या आडनावावरून चिडवायचे. त्यामुळे शाळेत असतानाच त्यांनी बनकर आडनाव टाकलं. आणि गावाच्या नावावरून नांद्रेकर हे आडनाव घेतलं. तेव्हापासून त्यांची ओळख ही नंदा नांद्रेकर अशीच झाली. अगदी लग्नानंतरही त्यांचे पती मिलिंद मोरे यांनी त्यांची नंदा नांद्रेकर ही ओळख कायम ठेवली.

बाबासाहेबांच्या गाण्यांची पुस्तके दप्तरात

नंदा नांद्रेकर यांचे वडील लक्ष्मण बनकर यांना गाण्याचा प्रचंड शौक होता. ते जुनी गाणी गायचे. पोवाडे, भारूड गाणं त्यांना विशेष आवडायचं. वडिलांचं गाणं लहानग्या नंदाच्या कानावर पडायचं. त्यामुळे कान तयार झाला आणि त्यांनाही गाण्याची गोडी लागली. पुढे आवडी पोटी त्या शाळेतील गायन स्पर्धेत भाग घेऊ लागल्या. बरं त्यांचं गाण्याचं वेड हे इथपर्यंतच थांबलेलं नव्हतं. तर साळेत असताना दप्तरात शालेय पुस्तकांबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाण्याची पुस्तके ठेवू लागल्या. वेळ मिळेल तसा या पुस्तकातील गाणी गाऊ लागल्या. त्यांचं गाणं आणि शिकणं दोन्ही एकाचवेळी सुरू होतं.

मावशीचा आधार

गाण्याच्या नादातूनच त्यांनी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. दीड वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. मात्र, त्या 16-17 वर्षाच्या असतील तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणीच आई गेली. आता वडील गेल्याने त्या पोरक्या झाल्या. त्यांचा जगण्याचा आधारच गेला. त्यांच्या शेजारीच त्यांची मावशी गंगाबाई सुरवाडे राहायच्या. त्यांनीच नंदाताईंना आधार दिला आणि मायेची ममताही.

अन् शास्त्रीय संगीताचं शिक्षण अर्धवट राहिलं

वडील गेल्याने नंदाताईंचं शास्त्रीय संगीताचं शिक्षणही अर्धवट राहिलं. त्यावेळी वस्तीमध्ये जयंती कार्यक्रम व्हायचे. मोठमोठे गायक येऊन कार्यक्रम करायचे. रात्र रात्र जागून त्या हे कार्यक्रम पाहायचे. कार्यक्रम संपता संपता गायकाला विनंती करून त्याही स्टेजवर एखादं गाणं म्हणायच्या. त्यातून त्यांची भीड चेपत गेली. मग प्रत्येक कार्यक्रमात त्या गायकाला विनंती करून गायला लागल्या. मात्र, त्यांना गायिका म्हणून कुणीही संधी दिली नाही. सर्व दिवस सारखे राहत नसतात. त्या प्रमाणे एक दिवस त्यांनाही संधी मिळाली. कवी सानंद गायकवाड आणि कवयित्री मंगल धनगर यांनी त्यांना संधी दिली. त्यांनीच नंदाताईंना खऱ्या अर्थाने स्टेजवर आणले.

पहिला कार्यक्रम

1990मध्ये नंदा नांद्रेकर यांनी गायिका म्हणून पहिला कार्यक्रम केला. खोपोलीत वासर म्हणून गाव आहे. तिथे दिनकर शिंदे यांच्याविरुद्ध त्यांचा पहिला कव्वालीचा सामना झाला. पहिल्याच कार्यक्रमात त्या घाबरल्या होत्या. त्यांनी भीत भीतच दोन गाणी म्हटली. पण ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने भीड चेपली आणि त्यांनी कार्यक्रम गाजवला. त्यांचा 1990पासून सुरू झालेला हा गाण्याचा प्रवास अजून सुरू असून आतापर्यंत त्यांनी चार हजारांच्यावर गाणी गायली आहेत.

नंदाताईंची लोकप्रिय गाणी

ओ रामजी शिकवा भिवाला, शिक्षण पुरे ते शिकवा भिवाला, सांगे केळुस्कर गुरुजी ऐका रामजी, शिकवा भिवाला…

आणि

काय सांगू बाई शिक्षणापायी, परदेशी जाऊन आले, माझे भीमराय साहेब झाले…

आणि

ओळख माझी देतेय रोजी, आणि त्या घटनाकाराची, कोणी मी या नरवीराची बाई गं, लेक मी आंबेडकरांची… (साभार, आंबेडकर कलावंत) (know about nanda nandrekar journey, how she became singer)

संबंधित बातम्या:

‘पुण्याचा राघू’ने ओळख मिळाली, आनंद-मिलिंद शिंदेंचा प्रभाव; वाचा, गायक राहुल शिंदे यांचे किस्से

पुण्यातील भिंती रंगवल्या, आंदोलने, राडेही केले, आज गायक म्हणून लोकप्रिय!; वाचा, राहुल शिंदेंचे किस्से

सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा

(know about nanda nandrekar journey, how she became singer)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.