पुण्यातील भिंती रंगवल्या, आंदोलने, राडेही केले, आज गायक म्हणून लोकप्रिय!; वाचा, राहुल शिंदेंचे किस्से

| Updated on: May 05, 2021 | 7:31 PM

लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचा अनेक नवोदित गायकांवर प्रभाव आहे. (know how rahul shinde life change after met milind shinde)

पुण्यातील भिंती रंगवल्या, आंदोलने, राडेही केले, आज गायक म्हणून लोकप्रिय!; वाचा, राहुल शिंदेंचे किस्से
rahul shinde
Follow us on

मुंबई: लोकप्रिय गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे यांचा अनेक नवोदित गायकांवर प्रभाव आहे. आनंद-मिलिंद सारखं गाता यावं आणि लोकप्रियता मिळावी असं अनेक गायकांना वाटतं. पुण्यातील गायक राहुल शिंदे हे त्यापैकीच एक. त्यांच्यावर आनंद-मिलिंद शिंदे यांचा प्रचंड प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर त्यांची गाण्याची शैली आणि आवाजही आनंद शिंदे यांच्यासारखाच हुबेहुब आहे. गायक म्हणून राहुल शिंदे यांची जडणघडण कशी झाली, याचा घेतलेला हा आढावा. (know how rahul shinde life change after met milind shinde)

अन् घरातच मैफली रंगायच्या

राहुल शिंदे यांचे वडील अनंत शिंदे हे गायक होते. 2007मध्ये वयाच्या 75व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूपूर्वी मुलाला नावाजलेला गायक होताना पाहायचं भाग्य त्यांना मिळालं. अनंत शिंदे यांची पुण्यात जयभीम गायन पार्टी होती. त्यांची ही गायन पार्टी पुण्यात प्रसिद्ध होती. शिवाय शिंदे यांच्या घरात नेहमीच गाण्याची मैफल रंगायची. गोविंद म्हशीलकर आणि नवनीत खरे आदी नामवंत मंडळी त्यांच्या घरी येत असंत. घरातील मैफली, गाण्यांवरील चर्चा, गाणं लिहिण्यापासून ते गाणं बसवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया राहुल हे लहानपणापासून पाहत होते. त्यामुळे त्यांचे कान तयार झाले. त्यांनाही गाण्याची समज आली आणि गाणं गायला लागले.

भिंती रंगवल्या

घरच्या गरीबीमुळे राहुल यांचं शिक्षण जास्त झालं नाही. इयत्ता नववीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांचे बंधू रवींद्र शिंदे हे डबल ग्रॅज्युएट आहेत. सुरुवातीच्या काळात राहुल यांनी रबर स्वास्तिक कंपनीत नोकरी पत्करली. परंतु कंपनी बंद झाल्याने त्यांनी काही काळ भिंती रंगवण्याचं (वॉल पेंटींग) काम केलं.

अन् टर्निंग पॉइंट मिळाला

तारुण्यात असतानाच ते दलित पँथर चळवळीला जोडले गेले. रास्ता रोको, आंदोलने आणि राड्यात ते आघाडीवर असायचे. त्यामुळे पोलीस केसेसेही झाल्या. पण अजूनही आयुष्याला दिशा मिळत नव्हती. काय करावं? कुठे जावं कळत नव्हतं. त्याचवेळी बोपोडीत नाईक चाळीत जयंती निमित्ताने मिलिंद शिंदेंचा गायन पार्टीचा कार्यक्रम होता. राहुल लहानपणापासूनच आनंद-मिलिंद यांचे फॅन होते. गाण्याच्या कार्यक्रमानंतर ते मिलिंद शिंदेंना भेटले आणि त्यांनी आपल्या गाण्याच्या वेडाविषयी मिलिंद यांना सांगितलं. मिलिंदही राहुल यांच्या विनंतीवरून त्यांच्या घरी गेले. राहुल यांच्या वडिलांशी गप्पा मारल्या. त्यातून दोन्ही कुटुंब जवळ आलं. मिलिंदच नव्हे तर प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदेही राहुल यांच्या घरी येऊ लागले अन् इथूनच त्यांच्या जीवनाला टर्निंग पॉइंट मिळाला. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know how rahul shinde life change after met milind shinde)

संबंधित बातम्या:

सेटवर गाण्याचं पेमेंट घ्यायला गेले, निळूभाऊंनी थेट सिनेमात कामच दिलं; वाचा, पुणेकरांचा अफलातून किस्सा

‘या’ पाच गाण्यांनी ज्ञानेश पुणेकर घराघरात पोहोचले, तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

लिहीत राहा, प्रगती करा, साक्षात निळूभाऊंकडून कौतुक; वाचा, कोण आहेत ज्ञानेश पुणेकर

(know how rahul shinde life change after met milind shinde)