AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kriti Sanon | ‘आदिपुरुष’ सिनेमातील क्रिती सेनन हिचं भव्य रुप, पाहा मोशन पोस्टर व्हिडीओ

'जानकी जाने एक ही नाम, पतित पावन सीता राम!', क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' सिनेमाच्या पोस्टरमध्ये सीतेच्या भूमिकेत अभिनेत्रीचं भव्य रुप... पाहा व्हिडीओ...

Kriti Sanon | 'आदिपुरुष' सिनेमातील क्रिती सेनन हिचं भव्य रुप, पाहा मोशन पोस्टर व्हिडीओ
| Updated on: Apr 29, 2023 | 1:01 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाची जोरदार चर्चा रंगत आहे. सिनेमासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशात सीता नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’ सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमातील क्रितीची भूमिका हिंदू पौराणिक कथा रामायणातील सीतेपासून प्रेरित आहे. व्हिडीओमध्ये जानकीच्या भूमिकेत क्रितीची ओळख असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये पार्श्वभूमीत ‘जय सिया राम’ हे गाणं वाजताना दिसत आहे. दिग्दर्शत ओम राऊन दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमा ‘रामायण’चं रुप असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे, सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्यापूर्वी न्यूयॉर्कमधील 2023 ट्रिबेका फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर होईल.

‘जानकी जाने एक ही नाम, पतित पावन सीता राम!’ मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा आहे. सिनेमात भारतीय इतिहासातील सर्वात आदरणीय महिलांपैकी एक, माता सीतेची भूमिका साकारताना क्रिती दिसणार आहे. त्यामुळे अभिनेत्रीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत. सिनेमाचा मोशन पोस्टर खुद्द अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर प्रदर्शित केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

माता सीता यांना निस्वार्थीपणा, शौर्य आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जाचं . पोस्टरमध्ये जानकी तसेच राम आणि मधुर ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर देखील आहे. मोशन पोस्टरमध्ये जानकीच्या भूमिकेतील कृती सेनन, प्रभासची पत्नी म्हणून पवित्रता, दिव्यता आणि धैर्याने उभी आहे. जानकीचे राघववरील अखंड प्रेम दर्शवणारी राम सिया रामची मधुर धून प्रेक्षकांना अध्यात्म आणि भक्तीत तल्लीन करणारी आहे.

आदिपुरुष सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. टी-सीरीजचे भूषण कुमार आणि कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर यांनी निर्मिती केली आहे. अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा 16 जून 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन आणि अभिनेता प्रभास सध्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सिनेमाबद्दल नवीन अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Follow Us
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष