
आजच्या धकाधकीच्या जीवनात काही तरी मनोरंजनासाठी हवं असतं. अशात ओटीटी प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावतं… सध्या नेटफ्लिक्स एक सीरिज पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. नेटफ्लिक्सवर नवीन सिनेमा आणि सीरिजची संख्या काही कमी नाही. अशात अभिनेता कुणाल खेमूचा नुकताच प्रदर्शित झालेला “सिंगल पापा” हा सीरिज सध्या चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शित झालेली हा हलकीफुलकी सीरिज नेटफ्लिक्सवर येताच हिट झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारे नवीन सिनेमे आणि सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीनुसार आपलं स्थान स्थापित करतात. सध्या नेटफ्लिक्सवर “सिंगल पापा” पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग करत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिंगल पापा सीरिजची चर्चा रंगली आहे. 12 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज सहा एपिसोडची आहे. प्रदर्शित झाल्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिट झाली आहे. “सिंगल पापा” ही नेटफ्लिक्सवरील सीरिज आधुनिक कुटुंब आणि पालकत्वाची साधी कल्पना सादर करते. ही कथा एका सामान्य माणसाची आहे जो अचानक एका महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तयार होतो. ही जबाबदारी पेलण्यासाठी तो हळूहळू स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणतो.
“सिंगल पापा” ही सहा एपिसोडची विनोदी सीरिज आहे ज्यामध्ये कुणाल खेमू गौरव गेहलोतची भूमिका साकारताना दिसत आहे, जो अनेकदा स्वतःची जबाबदारी टाळतो. एके दिवशी, त्याला त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर एक लहान मूल सापडतं आणि तो त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतो. गौरवच्या निर्णयानं त्याचे कुटुंबिय चकित होतात आणि प्रत्येक जण आपलं स्वतःचं मत मांडण्यास सुरुवात करतं.
अभिनेता दत्तक संस्थेच्या नियमांचं पालन करण्यास तयार असला तरी, तिथे काम करणाऱ्या श्रीमती नेहरा त्याला मूल दत्तक देण्यासाठी विरोध करतात. एकटा बाप मुलाचं सांभळ करु शकत नाही.. मुलांच्या संगोपणात अडचणी येवू शकतात… असं त्यांचं म्हणणं असतं…
कुणाल याने ही भूमिका सहजतेने आणि सुंदरपणे निभावली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांनी देखील ती जवळची वाटली आहे.. मनोज पाहवा आणि आयेशा राजा मिश्रा गौरव याच्या आई – वडिलांच्या भूमिकेत लोकांना आवडलेले आहेत. कुणाल खेमूची सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तर ‘दिल्ली क्राइम’ चौथ्या क्रमांकावर आहे.