
Bigg Boss 19: अभिनेता सलमान खान होस्टेड वादग्रस्त ‘बिग बॉस 19’ शोला नवीन कॅप्टन मिळाला आहे. यंदाच्या आठवड्यासाठी अमाल मलिक याच्या खांद्यावर घरातील कॅप्टन पदाची जबाबदारी आहे. घरातील सर्व सदस्यांच्या सहमतीने अमाल याला कॅप्टन्सी मिळाली आहे. तर दुसरीकडे पुन्हा तान्या मित्तल हिची चर्चा सुरु झाली आहे. तान्या कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सर्वांसमोर कायम स्वतःच्या श्रीमंतीचा देखावा करणारी तान्या मित्तल पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता तान्या आमदार बॉयफ्रेंडमुळे नाही तर, विवाहित बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे आणि याची पोलखोल अभिनेत्री कुनिका सदानंद हिने केली आहे.
सांगायचं झालं तर, अमाल याची कॅप्टन पदासाठी निवड झाल्यानंतर कुनिका आणि निलम या दोघींमध्ये तान्या हिच्याबद्दल चर्चा सुरु होते. कुनिका, निलम हिला म्हणते, ‘मला वाटतं तिला काहीतरी मानसिक समस्या आहे. तिने मला सांगितलं की तिचे वडील कदाचित तिच्यासोबत राहत नाहीत. ती तिच्या आईसोबत राहते. कुनिकाने तर असंही सांगितलं की तिला काहीतरी समस्या आहे आणि ती सामान्य नाही.’
तान्याची आणखी एक पोलखोल करताना कुनिका हिने आणखी एक मोठा खुलासा केला. कुनिका म्हणाली, ‘तान्या हिने मला एकदा विचारलं होतं की, विवाहित पुरुषावर प्रेम करणं योग्य आहे का? तेव्हा मी तिला सांगितलं होतं काहीही हरकत नाही…’ तेव्हा निलम म्हणजे, ‘विचित्र तर ती आहे, कायम रडत असते त्यानंतर वायफळ बडबड करत असते…’
गेल्या काही दिवसांपासून तान्या मित्तलला तिच्या बोलक्या स्वभावामुळे आणि जबरदस्तीने संपत्तीचा देखावा करत असल्यामुळे खूप ट्रोल होत आहे. प्रेक्षकच नाही तर, घरातील सदस्य देखील तान्या हिला ट्रोल करतात. एकदा बॉयफ्रेंडबद्दल बोलताना तान्या म्हणाली होती. ‘एक आमदारासोबत माझे प्रेमसंबंध होते आणि आमचं नातं देखील चांगलं होतं… ‘, ज्यामुळे तान्या तुफान चर्चेत आली होती.
सध्या बिग बॉस तुफान चर्चेत आला आहे. शोचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘विकेंडका वार’ दरम्यान सलमान खान सर्व स्पर्धकांना चांगलंच सुनावताना दिसतो. त्यामुळे ‘बिग बॉस 19’ शोमध्ये पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.