तू तर मीठ मसाला टाकण्याचं काम केलंय… सुप्रीम कोर्टाने कंगना राणौतला फटकारलं; दिलासा नाहीच, अडचणी वाढल्या
Kanagana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत पून्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहे. सुप्रीम कोर्टाने कंगना राणौतला फटकारलं; दिलासा नाहीच, अडचणी वाढल्या

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात असतात. आता देखील कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणा सुप्रीम कोर्टाने कंगना यांना दिलासा देण्यास नकार दिली आहे. सांगायचं झालं तर, कंगना यांनी शेतकरी आंदोलनावर पोस्ट केली होती. याप्रकरणी कोर्टाने म्हटलं आहे की, ते ट्विट साधारण ट्विट नव्हतं, त्यामध्ये मसाला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रद्द करण्याच्या याचिकेत त्याचं स्पष्टीकरण विचारात घेतलं जाऊ शकत नाही.
कंगना राणौत यांनी बदनामीकारक विधानं केल्याबद्दल त्यांच्याविरुद्धची तक्रार रद्द करण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे. याप्रकरणी सुनावणी विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांचं खंड पीठ करत आहेत. खंडपीठाने याचिकेवर विचार करण्यास अनिच्छा दर्शविल्यानंतर, कंगना यांच्या वकिलाने याचिका मागे घेतली.
सांगायचं झालं तर, 2020-21 च्या शेती कायद्यांविरुद्धच्या शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान एका महिला निदर्शकाबद्दल टिप्पणी करणाऱ्या पोस्टसाठी कंगना हिने तिच्याविरुद्धच्या मानहानीच्या तक्रारीला आव्हान दिलं होतं.
सुप्रीम कोर्टातील महत्त्वाचे मुद्दे…
सोशल मीडिया कमेंट प्रकरणात कंगना यांना दिलासा देण्यास सर्वोच्च कोर्टाने नकार दिला…
संबंधित प्रकरण हे कंगना यांच्या कृषी कायद्यांवरील पोस्टशी संबंधित आहे.
कंगना राणौत यांनी तक्रार रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मागे घेतली…
कोर्टाने विचारलं की तुमच्या टिप्पण्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
कोर्टाने सांगितलं की, तुम्ही त्यात मसाला टाकला कारण ही कोणत्याही प्रकारे सामान्य पोस्ट नव्हती.
काय आहे प्रकरण?
पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील बहादुरगड जांडियान गावातील रहिवासी असलेल्या महिंगर कौर यांनी जानेवारी 2021 मध्ये भटिंडा येथे तक्रार दाखल केली.भटिंडा कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की कंगना यांनी रिट्विटमध्ये त्यांच्यावर “खोटे आरोप” केले आहेत आणि ही तीच “दादी” आहे जी शाहीन बाग निषेधाचा भाग होती… असं म्हटलं होतं. आता याप्रकरणी पुढे काय होत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
