AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्यावर जडलेला राजघराण्यातील क्रिकेटरचा जीव, मैत्रीसह जुळल्या प्रेमाच्या गाठी; पण एका कारणामुळे अपूर्ण राहिली लव्ह स्टोरी

Lata Mangeshkar Love Story : लता मंगेशकर यांनी कायम त्यांचं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. पण, तुम्हाला माहितीये का? एक राजघराण्यातील क्रिकेटपटू लता मंगेशकर यांच्या प्रेमात होता. पण, एका कारणामुळे त्यांची लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली.

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्यावर जडलेला राजघराण्यातील क्रिकेटरचा जीव, मैत्रीसह जुळल्या प्रेमाच्या गाठी; पण एका कारणामुळे अपूर्ण राहिली लव्ह स्टोरी
| Updated on: Oct 05, 2026 | 8:35 PM
Share

लता मंगेशकर यांनी त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले. तरीही, अनेक दशकं एका व्यक्तीचं नाव त्यांच्याशी जोडलेलं राहिलं. ते म्हणजे राज सिंह डुंगरपूर. राज हे राजस्थानमधील राजघराण्यातील सदस्य, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे (BCCI) माजी अध्यक्ष होते. या नात्याबद्दल दोघांनीही कधीच सार्वजनिकरीत्या सविस्तर भाष्य केलं नाही. मात्र, डुंगरपूर यांनी ‘मिड-डे’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलेलं. लता दीदी आणि राज दोघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते, आपल्या कुटुंबांशी अत्यंत एकनिष्ठ होते आणि लग्न न होऊनही त्यांच्यातील मैत्री कायम राहिली.

लता मंगेशकर आणि राज सिंह डुंगरपूर यांची पहिली भेट

डुंगरपूर यांनी स्वतः १९५९ मधील त्या भेटीची आठवण सांगितली. राज कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांनी ‘मिड-डे’ला सांगितलं की, दिलीप सरदेसाईंचे चुलत भाऊ सोपान सरदेसाई यांना त्यांनी सांगितलं होतं की, क्रिकेट खेळल्याशिवाय त्यांना राहवत नाही. तेव्हा सरदेसाईंनी त्यांना वाळकेश्वरमधील एका घरी जाण्यास सांगितलं, तिथे लता यांचे भाऊ आणि त्यांचे मित्र टेनिस-बॉल क्रिकेट खेळत असत.

त्या काळात लता मंगेशकर यांच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणावर सुरू होतं आणि डुंगरपूर यांनी सांगितलेलं की, त्यांना लताजींना भेटण्यात विशेष रस नव्हता. ते क्रिकेट खेळायचे आणि नेपियन सी रोडवरील आपल्या बहिणीच्या घरी परत जायचे. पण जेव्हा त्यांना वर बोलावण्यात आलं, तेव्हा परिस्थिती बदलली. राज यांनी लताजींचं वर्णन ‘अत्यंत सुंदर व्यक्तिमत्त्व’ असं केलं. लता दीदी, राज यांना सोडायला खाली आल्या होत्या. ‘मी त्यांच्या काही रेकॉर्डिंग्जच्या वेळी आणि इतर कार्यक्रमांना जायचो‘, असंही राज यांनी सांगितलं.

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, डुंगरपूर हे लता दीदींचे खूप चांगले मित्र होते. पण, दोघांनाही त्यांच्या मैत्रीबद्दल सार्वजनिक चर्चा होणं आवडायचं नाही. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत लता दीदींना प्रेमाबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील भाग्यवान पुरुष कोण होता, याबद्दल विचारण्यात आलं. यावर, ‘काही गोष्टी केवळ हृदयालाच ठाऊक असाव्यात. त्या तशाच राहू द्या’ असं लता दीदी म्हणालेल्या.

लता मंगेशकर आणि राज सिंह डुंगरपूर यांनी लग्न का केलं नाही?

या मुद्द्यावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले आहेत. नंतरच्या काळात आलेल्या वृत्तांनुसार, डुंगरपूर यांच्या राजघराण्यानं या नात्याला विरोध केला होता. एका राजघराण्यातील मुलगीच आपली सून व्हावी, अशी त्यांची इच्छा होती आणि मंगेशकर यांच्या कुटुंबाला लता दीदींसाठी मराठी जोडीदार निवडायचा होता. ‘मिड-डे’च्या मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल विचारलं असता राज म्हणाले, ‘ही अत्यंत खाजगी बाब आहे. पण आम्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलो होतो. साठचं दशक खूप वेगळं होतं. काही गोष्टी अशा असतात ज्या घडून येत नाहीत. आमच्यात मैत्री आहे आणि आम्ही अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहोत.’

१९९९ मधील एका मुलाखतीत लता दीदींना त्यांच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर लता दीदी म्हणाल्या, ‘मला त्याबद्दल विचार करायला कधी वेळच मिळाला नाही’ लता यांनी वयाच्या तेराव्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती आणि वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारली होती.

Follow Us
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने