Video : चक्क रिक्षाने बनियानवर फिरताना दिसला वरुण धवन, अभिनेत्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल
बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. वरुण धवन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने धमाका केला.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा नेहमीच चर्चेत असतो. वरुण धवन यांचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. वरुण धवन याच्यासोबत बवाल या चित्रपटामध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही मुख्य भूमिकेत दिसली. वरुण धवन हा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. गेल्या काही दिवसांपासून वरुण धवन याचे चित्रपट काही खास धमाका करू शकत नाहीयेत. वरुण धवन याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय.
वरुण धवन हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आला. मात्र, नुकताच वरुण धवन याने असे काही केले की, लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. वरुण धवन हा नुकताच चित्रपटाच्या शूटिंगनंतर थेट रिक्षाने प्रवास करताना दिसला. विशेष बाब म्हणजे आलिशान गाड्या सोडून तो रिक्षाने प्रवास करतोय.
आता वरुण धवन याचा रिक्षाने प्रवास करतानाचा व्हिडीओ पुढे आलाय. इतकेच नाही तर याचे फोटोही व्हायरल होत आहेत. यावेळी वरुण धवन याच्यासोबत अभिनेत्री कीर्ति सुरेश ही देखील दिसलीये. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, अरे वा इतक्या महागड्या गाड्या सोडून हा रिक्षाने फिरतोय.
View this post on Instagram
दुसऱ्याने लिहिले की, चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर हे सर्वकाही नाटक सुरू आहे. तिसऱ्याने लिहिले की, या काही गोष्टींमुळेच मी वरुण धवन यांचा फॅन आहे. वरुण धवन हा वीडी 18 चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. वरुण धवन यांचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय.
वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये त्याच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे दिसले. वरुण धवन याने इंस्टा स्टोरीवर फोटो शेअर करत लिहिले की, हे कसे झाले मलाच कळाले नाहीये. आता खूप जास्त त्रास होतोय. यावेळी वरुण धवन याने आपला पाय बर्फामध्ये ठेवल्याचे स्पष्ट दिसले. वरुण धवन याच्या या फोटोंनंतर चाहत्यांमध्ये चिंता दिसली.