AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला कोणाशीच शारीरिक संबंध.. आकांक्षाचा ‘लॉकअप 2’ मध्ये आणखी एक गौप्यस्फोट

लॉकअप 2 मध्ये आकांक्षाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. बायसेक्श्युअल असल्याचा खुलासा केल्यानंतर आता ती असेक्शुअल झाल्याचे तिने सांगितले. गौरव खन्नासोबत घटस्फोट, लग्नाची भीती आणि मातृत्व स्वीकारण्यास नकार हे तिचे मुख्य खुलासे आहेत. सेलिब्रिटींच्या या धाडसी अभिव्यक्तीने प्रेक्षकही आवाक झाले आहेत.

मला कोणाशीच शारीरिक संबंध.. आकांक्षाचा 'लॉकअप 2' मध्ये आणखी एक गौप्यस्फोट
आकांक्षा चमोलाचा आणखी एक गौप्यस्फोट
| Updated on: Jul 14, 2026 | 8:27 AM
Share

Lock Upp 2 या नेटफ्लिक्सवरील रिॲलिटीशोमध्ये सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक मोठे खुलासे करत आहेत. सोशल मीडियावर ls मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शोच्या सुरुवातीलाच टीव्ही अभिनेता गौरव खन्ना याची पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केले होते. ती आणि गौरव खन्ना यांचा घटस्फोट होणार आहे. गेल्या एका वर्षापासून आम्ही दोघेही वेगळे राहत आहोत, असं तिने कबूल केलं होतं. एवढंच नव्हे तर काही काळाने तिने आपण बायसेक्श्युअल (Bisexual) असल्याचंही सांगितलं होतं. मात्र तिच्या खुलाशांची मालिक संपतच नाहीये. आता शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये तिने आणखी एक गौप्यस्फोट केलाय. मी आता आता असेक्शुअल झाले आहे, असं तिने नुकतच कबूल केलं. याचा अर्थ तिला आता कोणाशीच शारीरिक संबंध ठेवण्याची कोणतीही इच्छा नाही. आकांक्षाच्या या सलग खुलाशांमुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत.

लग्नाबाबत आकांक्षाच्या मनात भीती

Lock Upp 2 च्या ताज्या भागात वरुण यादव यांच्याशी संवाद साधताना आकांक्षा म्हणाली की, सेक्शुॲलिटी ही आयुष्याच्या टप्प्यानुसार बदलू शकते. सध्या माझा घटस्फोट सुरू आहे. त्यामुळे मला कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. मुलींसोबतही नाही. याच आकांक्षाने याआधी शोमध्ये सांगितले होते की, ती आणि अभिनेता गौरव खन्ना गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असून त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, तिने स्वतःला बायसेक्शुअल असल्याचेही जाहीर केले होते. सध्याच्या अनुभवामुळे त्यांच्या मनात विवाहाविषयी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा लग्न करण्याचा विचारही त्या करू शकत नाहीत, असंही ती म्हणाली.

आई बनण्याची इच्छा नाही

आई होण्याच्या विषयावरही आकांक्षा हिने स्पष्ट भूमिका मांडली. “माझ्या मनात आई होण्याची भावना नाही. मला मूल नको आहे. मात्र गौरवला वडील व्हायचं होतं,” असे तिने म्हटलं होतं.

मला मुली आवडतात

आपल्या लैंगिक ओळखीबद्दल बोलताना आकांक्षा म्हणाली होती की, तिवला महिलांबद्दल आकर्षण वाटते. “मला महिलांचा सहवास, त्यांची ऊर्जा आणि त्यांचा सहज स्वभाव आवडतो. मला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटते. प्रत्येक महिला मला सुंदर वाटते,” असे तिने नमूद केलं होतं.

गौरवकडून आकांक्षाला पाठिंबा

दरम्यान, शोमध्ये आकांक्षा हिने घटस्फोटाबद्दल माहिती दिल्यानंतर काही काळाने अभिनेता गौरव खन्ना हा पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. त्याने आकांक्षाला पाठिंबा दर्शवला. कायदेशीरदृष्ट्या ते अद्याप पती-पत्नी असले तरी ते वेगळे होत आहेत. मात्र, आकांक्षाविरोधात कोणतीही चुकीची किंवा कटू टिप्पणी ते सहन करणार नसल्याचं गौरवने स्पष्ट केलं होतं.

Follow Us