AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार निघाला गोविंदा…, अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, तर बायको थाटणार दुसरा संसार?

वयाच्या 59 व्या वर्षी गोविंदाची बायको थाटणार दुसरा संसार? अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, सुनीता अहुजा म्हणते, 'गोविंदा तर गद्दार निघाला म्हणून... ', गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे... आता सुनीताने नवऱ्याच्या अफेअरवर मोठं वक्तव्य केलं आहे.

गद्दार निघाला गोविंदा..., अभिनेत्याचे अनेक महिलांसोबत अफेअर, तर बायको थाटणार दुसरा संसार?
अभिनेता गोविंदा
| Updated on: Jul 01, 2026 | 2:21 PM
Share

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत असलेल्या ‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये सुनीता हिने गोविंदा याच्या अफेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गोविंदा याचे अनेक महिलांसोबत अफेअर होते… असं खुद्द सुनीता यांनी सांगितलं आहे… एवढंच नाही तर, गोविंदा याने नात्यात फसवणूक केल्यानंतर दुसऱ्या पुरुषासोबत नातं सुरु करणार का? यावर देखील सुनिता यांनी मोठा खुलासा केला आहे.

गोविंदा अद्यापही करत आहे, सुनिताची फसवणूक?

‘लॉक अप’ शोच्या दुसऱ्या सिझनच्या नुकतात झालेल्या एपिसोडमध्ये श्रेया कारला हिला सुनिता हिला विचारलं, गोविंदा अद्यापही धोका देतो का आणि तू तुझ्यावर प्रेम करणाऱ्या जोडीदारासोबत राहण्यास तयार आहेस का? यावर सुनीता म्हणाली, ‘असं झालं तर, आता काय होऊ शकतं… हे तर सुरुवातीपासूनच सुरु आहे ना? हिरो आहे म्हणून तुम्ही काहीच बोलू शकत नाही आणि या वयात मी त्यांच्या अफेअरबद्दल अधिक विचार केला तर, माझा डायबिटीज आणखी वाढेल… त्यामुळे आता जसं सुरु आहे, तसंच राहू दिलेलं चांगलं आहे…’

त्यानंतर, श्रेयाने सुनीताला विचारलं की. यामुळे तुला दुःख होतं का. त्यावर त्या स्टार-पत्नीनं उत्तर दिलं की, मी आता केवळ आपल्या मुलांसाठी जगतेय. गोविंदाचं अजूनही कोणाशी अफेअर आहे का किंवा तो तिला फसवतो का, असं विचारल्यावर सुनीता म्हणाल्या, “तुम्ही कोणाला रोखू शकता का? मी 24 तास त्याच्या समोरच बसून राहते का? समोरच्या व्यक्तीलाही त्याचा त्रास होईल ना? मी त्याबद्दल विचारच करत नाही.”

सुनीता पुढे म्हणाली, ‘आमच्याकडे दोन घर आहेत. गोवींदाच्या घरात त्याला भेटण्यासाठी अनेक जण येत असतात. मला माझ्या घरात प्रायव्हसी हवी असते.’, दुसऱ्या जोडीदाराबद्दल देखील सुनीता हिने मोठं वक्तव्य केलं. म्हणाली, ‘दुसऱ्या प्रेमाचा शोध घेण्यात मला काहीही रस नाही… कायम मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे…’ पुढे सुनीता म्हणाल्या, ‘मला लहान असताना सांगण्यात आलेलं, जोडीदाराची साथ कधीच सोडायची नाही. पण हिरोला आपण आपल्या नियंत्रणात नाही ठेऊ शकत….

गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न

गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यांना दोन मुलं देखील आहे. त्यांच्या मुलगीचं नाव टीना आणि मुलाचं नाव यशवर्धन आहे… नुकताच अशी देखील माहिती समोर आली की, गोविंदा आणि सुनीता आता एकत्र राहत नाहीत, एवढंच नाही तर, दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण सुनीताने घटस्फोटाच्या फेटाळल्या. पण यावर गोविंदा याने मौन ठेवलं आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू