
Ranveer Allahbadia Controversy: प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. समय रैना याच्या शोमध्ये आई-वडिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर अनेक एफआयआर देखील दाखल करण्यात आल्या आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटी देखील रणवीर याच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसत आहेत. आता ‘महाभारत’ मालिकेत भीमची भूमिका साकारणाऱ्या WWE रेसलर सौरव गुर्जर याने देखील रणवीर याला धमकी दिली आहे.
सौरव गुर्जर याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘हा (रणवीर अलाहाबादिया) माफीच्या लायकीचा नाही. आज आपण यावर कारवाई केली नाही तर, उद्या दुसरा, तिसरा, चौथा अशाच प्रकारचे आपत्तीजनक वक्तव्य करेल. जर आपल्याला पुढील पिढी, व्यवस्था आणि धर्म वाचवायचा असेल तर, अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यामुळे पुढे असं काही करण्याचा कोणी विचार करणार नाही…’
😡😡😡 रणवीर इलाहाबादिया@BeerBicepsGuy
इसके ख़िलाफ़ सबको मिलकर आवाज उठानी ही होगी। @Dev_Fadnavis @mieknathshinde @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @AmitShah @PMOIndia @narendramodi pic.twitter.com/X8k6WE4GTi— Saurav Gurjar (@Thesauravgurjar) February 11, 2025
पुढे सौरव म्हणाला, ‘मझी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला विनंदी आहे की, कारवाई झाली पाहिजे. त्याने (रणवीर) आई – वडिलांवर घाणेरडे शब्द बोलले. असा निर्लज्ज माणूस स्वतःच्या आई – वडिलांच्या समोर कसा उभा राहते मला समजत नाही. मला इतका राग येतो की, मी या व्यक्तीला मुंबईत कुठेही, कोणत्याही पार्टीत, कोणत्याही शोमध्ये भेटलो तर त्याची सुरक्षा किंवा जगातील कोणतीही शक्ती त्याला वाचवू शकणार नाही. त्याने माफी मागितली असली तर कारवाई होणं गरजेचं आहे…’ सध्या सौरव याची सोशल मीडियावर पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
रणवीर याच्या विरोधात देशातील विविध राज्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पण प्रकरण अधिक तापत असल्याचं लक्षात येतात रणवीर फरार झाला आहे. आई-वडीलासंबंधी अश्लाघ्य टीका करणारा रणवीर अलाहबादिया याने समाज माध्यमावरच माफीचा ड्रामा रंगवला. पण तो अचानक गायब झाला आहे. त्याचा फोन बंद आहे, तर घराला सुद्धा भलं मोठं ताळं लागलंय. सध्या पोलीस रणवीरच्या शोधात आहेत.