जान्हवी किल्लेकरच्या सासऱ्यांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Bigg Boss Marathi Fame Janhavi Killekar: बिग बॉस मराठी सीझन 5 फेम जान्हवी किल्लेकरने केलाय मोठा खुलासा, अभिनेत्रीने सांगितलं सासऱ्यांचं अंडरवर्ल्ड कलेक्शन, सध्या सर्वत्र जान्हवीच्या वक्तव्याची चर्चा...

‘बिग बॉस’मुळे अनेक सेलिब्रिटींच्या करियरला नवी दिशा मिळाली. ‘बिग बॉस’मुळे नव्या कलाकारांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत देखली वाढ झाली. असंच काही मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्यासोबत देखील झालं. बिग बॉस मराठी सीझन 5 फेम जान्हवी किल्लेकरने बिग बॉसच्या घरात राहून चाहत्यांचं मनोरंजन केलं. तर अनेकदा अभिनेत्रीला ट्रोल देखील करण्यात आलं. बिग बॉसमध्ये असताना जान्हवीचे इतर स्पर्धकांसोबत होणारे वाद, तिच्या कुटुंबाबद्दल देखील तुफान चर्चा रंगल्या. आता देखील जान्हवीने तिच्या कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही असं ऐकलय या शोमध्ये जान्हवीला तिच्या कुटुंबाबद्दल विचारण्यात आलं. ‘तू ज्या फॅमिलीमध्ये लग्न केलंय, ती थोडी अंडरवर्ल्डवाली आहे?’ यावर जान्हवी होकार देत सासरे गुंड सारखे होते. शिवाय नवरा देखील गळ्यात प्रचंड सोनं घालून फिरायचा… असं अभिनेत्री म्हणाली आहे.
View this post on Instagram
जान्हवी म्हणाली, ‘अगदीच नाही म्हणता येणार पण हो… साधारण! कारण माझे सासरे गुंड सारखे होते. प्रत्येक जण त्यांना भाई म्हणायचे. गळ्या अगदी 50 तोळे सोनं… माझा नवरा देखील तेव्हा तसाच होता. घरचे श्रीमंत होते. त्यांचा केबलचा बिझनेस होता. त्यामुळे त्यांची केबलवाले म्हणून देखील ओळख होती…’
‘त्यांच्या घरी तलवारी होत्या. त्या तलवारी घेऊन ते फिरायतचे इतके गुंड होते. पण जेव्हा मी लग्न होऊन घरी आले, तेव्हा बाबा शांत होते. सगळं काही व्यवस्थित होतं. त्यांचा बॅकग्राऊंड आहे थोडसं अंडरवर्ल्डप्रमाणे…. असं जान्हवी. सध्या जान्हवीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
जान्हवीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ती सध्या स्टार प्रवाह वरील अबोली या मालिकेत इन्स्पेक्टर ची भूमिका साकारत आहे. जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस’मध्ये देखील अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
जान्हवी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
