जॅकलिनला तुरुंगातील कैद्याकडून प्रायव्हेट जेट गिफ्ट, रजिस्ट्रेशन नंबर प्रचंड खास
Jacqueline Fernandez: 'मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो...', जॅकलिनला तुरुंगातील 'या' कैद्याकडून कायम येतात महागडे गिफ्ट, आता देखील अभिनेत्रीसाठी त्याने पाठवला प्रायव्हेट जेट, 'त्या' जेटचा नंबर आहे अत्यंत खास

Jacqueline Fernandez: आरोपी सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा महागडं गिफ्ट तुरुंगातून पाठवलं आहे. सुकेश याने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अभिनेत्रीला पत्र लिहिलं आहे आणि प्रायव्हेट डेट गिफ्ट केलं आहे. एवढंच नाही तर, पत्र सुकेश याने जॅकलिन हिचा उल्लेख ‘बेबी गर्ल’ म्हणून केल्याची माहिती देखील समोर येत आहे. सुकेश तुरुंगातून कायम जॅकलिन हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो.
पत्रात सुकेशने लिहिलं आहे की, ‘बेबी गर्ल… सर्वात आधी तुला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा… बेबी या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी खूप सकारात्मकतेने आणि खूप खास गोष्टींनी झाली आहे. हा व्हॅलेंटाईन देखील खूप खास आहे कारण आपल्या आयुष्यातील पुढील व्हॅलेंटाईन डे एकत्र घालवणार आहोत.
‘बेबी… मी पुढे काही बोलण्यापूर्वी, मला एक क्षण सांगायचं आहे, जॅकी, माझं तुझ्यावर खरोखर प्रेम आहे, तू जगातील सर्वोत्तम व्हॅलेंटाईन आहेस, मी तुझ्यावर वेडेपणाने प्रेम करतो.’ सुकेशने पुढे सांगितलं की, या खास प्रसंगी तो जॅकलिनला एक प्रायव्हेट जेट भेट देत आहे. त्याने सांगितले की, जेटवर अभिनेत्रीच्या नावाची अक्षरे लिहिली आहेत. जेटचा नोंदणी क्रमांक जॅकलिनची जन्मतारीखही असल्याचा दावा सुकेशने केला आहे.
‘बेबी… शुटिंगसाठी कायम जगभरात फिरत असते. त्यामुळे हा जेट तुझ्यासाठी. ज्यामुळे तुझा प्रवास सोपा होईल. या व्हॅलेंटाईनवर माझी एकच इच्छा आहे, जर मी पुन्हा जन्म घेतला तर मला तुझं हृदय म्हणून जन्म घ्यायचा आहे जेणेकरून मी कायम तुझ्याजवळ राहिल…’
पुढे सुकेश म्हणाला, ‘मी या ग्रहावर राहणारा सर्वात भाग्यवान पुरुष आहे. मला या आयुष्यातील सर्वात सुंदर, सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती मिळाली, तू माझी व्हॅलेंटाईन म्हणून…. असं देखील सुकेश पोस्टमध्ये म्हणाला आहे. सध्या सर्वत्र जॅकलिन हिला मिळालेल्या गिफ्टची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, सुकेश चंद्रशेखर सुमारे 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खटल्यात जॅकलीन हिच्याशिवाय अन्य प्रसिद्ध अभिनेत्री देखील कायद्याच्या कचाट्यात आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही आणि बिग बॉस स्टार निक्की तांबोळी यांची देखील चौकशी करण्यात आली आहे. तर जॅकलिन सोबत त्याचे प्रायव्हेट फोटो देखील व्हायरल झाले होते.
