Akshaye Khanna in Mahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्यां’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
Mahakali : 'धुरंधर'मधील रेहमान डकैत बनून अक्षय खन्नाने मोठ्या पडद्यावर धमाल केली. आता या वर्षात दुसऱ्यांच्या त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे, 'महाकाली'चा प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय खन्नाचा थक्क करणार अंदाज दिसतोय.

Mahakali Shukracharya War Cry Promo Out : ‘धुरंधर’ मध्ये खलनायकी अंदाजात दिसलेल्या अक्षय खन्नाचं (Akshaye Khanna) खूप कौतुक झालं, त्याचा रेहमान डकैत सर्वांनाचा आवडला. पहिला पार्ट तर त्याच्याच नावे जास्त गाजला. त्यानंतर चाहत्यांना आता त्याच्या पुढल्या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. त्याच्या आगामी ‘महाकाली’ चा पहिला प्रोमो समोर आला असून त्यात अक्षय ‘शुक्राचार्य’ यांची भूमिका निभावत आहे. ‘महाकाली’ या पहिल्या प्रोमोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून अक्षयचा हा भन्नाट अंदाज पाहून चाहते अगदी थक्क झालेत. धर्म आणि अधर्मात होणाऱ्या युद्धाच्या बॅकग्राऊंडवर हा चित्रपट बेस्ड आगे. त्याचा 2 मिनिटं 53 सेकंदांचा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडलाय. ऑगस्ट महिन्यात याचा प्रोमो आला असला तरी हा चित्रपट पुढल्या वर्षी म्हणजेच 8 जानेवारी 2027 मध्ये रिलीज होणार आहे, व्हिडीओसोबतच रिलीज तारीखही जाहीर करण्यात आली.
पॅन-इंडिया फिल्म असलेल्या ‘महाकाली’ चा मेकर्सनी भलामोठ्ठा टीजर रिलीज केला. प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या बॅनर अंतर्गत बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटात पौराणिक दुनियेची झलक दिसली. ‘शुक्राचार्यज वॉर क्राय’ असं नाव असलेला सुमारे 3 मिनिटांचा भलामोठ्ठा हा टीजर असून अक्षय खन्ना हा शुक्राचार्यांच्या भूमिकेत दिसला आहे, या व्हिडीओत तो धर्म-अधर्माच्या लढाईबद्दलही बोलताना दिसला.
कसा आहे ‘महाकाली’ चा पहिला टीझर ?
या टीजरची सुरूवात महाकालीच्या रूपाने होते, एका बाळाच्या जन्माचं दृश्य दाखवण्यात येतं आणि त्यानंतर एक प्रभावी आवाज ऐकू येतो – “समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी समान श्रम केले. मात्र, विष्णूंनी केवळ देवांनाच अमृत दिले. हा धर्म होता की अधर्म? इंद्राच्या सिंहासनावरचा आमचा अधिकार हिरावून घेण्यात आला. हा धर्म होता की अधर्म? संपूर्ण असुर जातीला पाताळात ढकलून 14 लोकांचे दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद करण्यात आले. हा धर्म होता की अधर्म? आता केवळ 14 दिवसांत असुरांच्या विजयाचा जयघोष संपूर्ण विश्वात घुमेल आणि असुर कायमचे मुक्त होतील.” यानंतर अक्षय खन्नाची दमदार एंट्री होते. शुक्राचार्याच्या भूमिकेत त्याचा जबरदस्त लूक हा अतिशय लक्षवेधी ठरलाय.
लांब, भली मोठ्ठी चंदेरी पांढरी दाढी, वरच्या बाजूला बांधलेले विस्कटलेले केस, भेदक नजर आणि कपाळावरील तिलक—या सगळ्यामुळे अक्षय खन्नाचा अवतार अत्यंत प्रभावी दिसतो. क्षणभर तर त्याला ओळखणंही कठीण होतं. हा अक्षय खन्नाचा आतापर्यंतचा सर्वात वेगळा आणि अनोखा लूक ठरण्याची शक्यता आहे. त्याचा लूक आणि प्रोमो पाहता, तो तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याचंही दिसून येतं.
तसेच चित्रपटाच्या प्रोमोमध्ये भव्य सेट्स, प्रभावी व्हिज्युअल्स आणि मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेले VFX हेही विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहेत.अक्षयच्या या दमदार लूकमुळे चाहतेही प्रभावित झाले आहेत.