डायरेक्टरसोबत दोन रात्री हॉटेलमध्ये घालावल्यानंतर व्हायरल गर्ल म्हणते, ‘त्याने माझ्यावर वाईट नजरेने’

Monalisa Viral Girl: 'त्याने माझ्यावर वाईट नजरेने', दिग्दर्शकाबद्दल असं काय म्हणाली व्हायरल गर्ल मोनालिसा, बलात्काराच्या आरोपांमुळे दिग्दर्शक अटक, सध्या व्हायरल गर्ल मोनालिसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

डायरेक्टरसोबत दोन रात्री हॉटेलमध्ये घालावल्यानंतर व्हायरल गर्ल म्हणते, त्याने माझ्यावर वाईट नजरेने
| Updated on: Apr 15, 2025 | 3:04 PM

Monalisa Viral Girl: महाकुंभ 2025 मध्ये प्रसिद्धी झोतात आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ‘द डायरी ऑफ मणिपूर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मोनालिसा हिने दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सनोज मिश्रा याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. सनोज मिश्रा याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. सनोज याच्या अटकेनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

सनोज मिश्रा वादाच्या भोवऱ्यात असताना मोनालिसा हिने दिग्दर्शकाचं समर्थन केलं आहे. मोनालिसा म्हणाली, ‘सनोज मिश्रा एक चांगले व्यक्ती आहे. सोशल मीडियावर लोकांना अफवा पसरवल्या आहे. सनोज मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानता आणि त्यांनी कधीच मला वाईट नजरेनं पाहिलेलं नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, त्यांच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवू नका…’ मोनालिसा हिने व्हिडीओ 13 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

 

 

एवढंच नाही तर, मोनालिसा हिने एका मुलाखतीत धक्कादायक दावा केला. समोज मिश्रासोबत हॉटेलमध्ये थांबाल्याची कबुली मोनालिसा हिने दिली. मोनालिसा म्हणाली, ‘समोज सर एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांच्यासोबत जे होत आहे ते चुकीचं आहे.’ सनोजने माझ्यासोबत काहीही वाईट केलेलं नाही… असं देखील मोनालिसा म्हणाली आहे.

 

 

मोनालिसाचं वक्तव्य सर्वांना हैराण करणारं आहे. महाकुंभ दरम्यान सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा हिला सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. पण व्हायरल गर्लला संधी देणारा दिग्दर्शकावर बलात्कारासारखे गंभीर आरोप आहेत. सनोज याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे. 28 वर्षांच्या एका तरुणीने सनोज मिश्रावर बलात्काराचे आरोप केले आहेत.