Maharashtra Elections 2026: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ दिग्दर्शकाची शाई प्रकरणावर खोचक टीका, ‘शाई शर्टावर शिंपडली तर…’
Maharashtra Elections 2026: मतदानादरम्यान अनेक वाद समोर आले. त्यामधील चर्चेत राहिलेला वाद म्हणजे शाई... यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' दिग्दर्शकाने फेसबूक एक पोस्ट केली आहे. सध्या त्यांची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

Maharashtra Elections 2026: महाराष्ट्रात 29 महापालिकांसाठी गुरूवारी मतदान पार पडलं आहे. या 29 महापालिकांमध्ये 15 हजार 931 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मुंबईसह 29 महानगरपालिकांमध्ये एकूण 2 हजार 869 जागा आहेत. तर एकूण 3 कोटी 48 हजार मतदार आहेत. गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. पण अनेक ठिकाणी झेलेले वाद देखील समोर आले. तर मतदानादरम्यान अनेक वाद समोर आले. त्यामधील चर्चेत राहिलेला वाद म्हणजे शाई… मतदान प्रक्रियेनंतर मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. पण यंदाच्या वर्षी वापरण्यात आलेली सहजरित्या निघत असल्याचा आरोप अनेकांनी केला. अनेक ठिकाणी नेहमी वापरल्या जाणाऱ्या शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात आला. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सोशल मीडियावर यावर अनेक मिम्स देखील व्हायरल झाले. तर अनेकांनी हा प्रकार गंभीर असल्याचं देखील म्हटलं. एवढंच नाही तर, अनेकांनी मतदानात फेरबदल होण्याचील शक्यता देखील वर्तवली. अशात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
फेसबूकवर एक पोस्ट करत सचिन गोस्वामी म्हणाले, ‘शाळेत फाउंटन पेनची शाई कोणी शर्टावर शिंपडली की बटाटा घासून पण जायची नाही… चिवट होती ती.’ पोस्ट करताना सचिन गोस्वामी यांनी निवडणूक किंवा मतदान यासंदर्भात कोणताही उल्लेख केलेला नाही. पण त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी गोस्वामी यांच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘आजच्या शाईवर डिओ स्प्रे करा, लगेच निघते…’, दुसरा एक नेटकरी म्हणाला, ‘पूर्वी दोन महिने जायचे शाई जायला… आता तर आजच पूसट झाली आहे…’ सध्या गोस्वामी यांची पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.
मतदानादरम्यान समोर आलेल्या शाईच्या मुद्यावर अनेकांनी स्वतःचं मत माडंलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत शाई पुसल्याचं सांगत आहेत. दिग्दर्शक-निर्माते अभिजीत पानसे यांनी देखील व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाले, नेलपेंट रिमुव्हरने शाई निघून गेली…
