AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महेश मांजरेकरांची लेक ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाला करतेय डेट?

सलमान खानच्या 'दबंग 3' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सई मांजरेकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सईचं नाव बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाशी जोडलं जात आहे. नुकतंच या दोघांना मुंबईतल्या एका फुटबॉल ग्राऊंडवर पाहिलं गेलं.

महेश मांजरेकरांची लेक 'या' प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाला करतेय डेट?
Saiee M ManjrekarImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 09, 2024 | 9:55 AM
Share

मुंबई : 9 जानेवारी 2024 | अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने ‘दबंग 3’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अभिनेता सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर सई चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती विविध कारणांमुळे चर्चेत असते. सई सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. बॉलिवूड पदार्पणानंतर सईचं नाव बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाच्या मुलाशी जोडलं गेलं. सई त्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. वारंवार डेटिंगच्या चर्चा फेटाळल्यानंतर आता पुन्हा एकदा सईला त्याच्यासोबत पाहिलं गेलं आहे. कथित बॉयफ्रेंड सुभन नाडियादवाला आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत सईला मुंबईतल्या एका फुटबॉल ग्राऊंडवर पाहिलं गेलं.

यावेळी सईने शॉर्ट ब्लॅक ड्रेस आणि त्यावर त्याच रंगाचे शूज परिधान केले होते. तर दुसरीकडे सुभननेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. फुटबॉल ग्राऊंडमधून बाहेर पडताना पापाराझींनी या दोघांचे फोटो क्लिक केले आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून सई आणि सुभानच्या डेटिंगच्या चर्चा आहेत. सुभान हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा मुलगा आहे. 2022 मध्ये सईने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. सुभान हा फक्त माझा लहानपणीचा मित्र आहे आणि अनेकदा आम्ही एकमेकांना भेटतो, असं तिने स्पष्ट केलं होतं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सई म्हणाली होती, “सुभनला मी लहानपणापासून ओळखते. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. पण आमच्या डेटिंगच्या चर्चा खऱ्या नाहीत. जोपर्यंत मला, माझ्या मित्राला आणि कुटुंबीयांना आमच्या नात्याचं सत्य माहीत आहे, तोपर्यंत मला या चर्चांनी काही फरक पडत नाही.” आता फुटबॉल ग्राऊंडमधून बाहेर पडल्यानंतर सई आणि सुभानने पापाराझींना त्यांचे एकत्र फोटो क्लिक न करण्याची विनंती केली. “हा आमच्या खासगी आयुष्याचा प्रश्न आहे. आम्ही चांगले मित्र आहोत आणि त्यापेक्षा अधिक हे प्रकरण वाढू नये म्हणून विनंती करतोय”, असं त्यांनी म्हटलंय.

बॉलिवूडमध्ये साजिद नाडियादवाला हे फार मोठं नाव आहे. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट या निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. आता वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सुभानसुद्धा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं कळतंय. सलमान खानमुळे सुभान आणि सई यांची भेट झाली. विशेष म्हणजे सईचे वडील महेश मांजरेकर आणि सुभानचे वडील साजिद नाडियादवाला या दोघांसोबत सलमानची चांगली मैत्री आहे. त्यामुळे अनेकदा कुटुंबीयांच्या भेटीगाठीदरम्यान सुभान आणि सईची मैत्री झाली.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.