Malaika Arora – Arjun Kapoor यांनी पाहिला ‘जवान’ सिनेमा; पोस्ट शेअर करत म्हणाले…
Jawan | मलायका आरोरा - अर्जुन कपूर यांनी शाहरुख खान याला टॅग करत पोस्ट केली शेअर... दोघांनी पाहिला 'जवान' सिनेमा... 'जवान' सिनेमाची सर्वत्र चर्चा...

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), विजय सेतुपति (Vijay Sethupathi) आणि नयनतारा (Nayanthara) स्टारर ‘जवान’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहेत. 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने फक्त दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील ‘जवान’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. नुकताच अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी देखील अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा पाहिला आहे. शिवाय सिनेमा पाहिल्यानंतर दोघांनी किंग खान याला टॅग करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. अर्जुन आणि मलायका यांनी सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे.
मलायका हिने केलं किंग खान याचं कौतुक
मलायका अरोरा हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘शाहरुख खान याच्या सारखं कोणीही नाही.. नयनतारा तुला मोठ्या पडद्यावर पाहून प्रचंड आनंद झाला… एटली आणि सिनेमाच्या टीमला शुभेच्छा…’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगत आहे.

अभिनेता अर्जुन कपूर याने देखील शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा पाहिला आहे. अर्जुन कपूर याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘शाहरुख खान फक्त एकटा किंग… उत्तम… नयनतारा तुझं आमच्याकडे स्वागत आहे. आम्ही तुला जावू देणार नाही…’ असं लिहिलं आहे. ‘जवान’ सिनेमाचा दिग्दर्शक एटली याने अर्जुन याची पोस्ट स्वतःच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एटली याने पहिल्यांदा दिग्दर्शक एटली कुमार याच्यासोबत काम केलं आहे. एटली याने ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्यासोबत नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोवर यांची देखील मुख्य भूमिका आहे.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या दिवशी देशात ७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर जगभरात सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. किंग खानच्या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ दिसून येत आहे. अभिनेत्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
