Malaika Arora हिच्या आयुष्यात ‘खान’ आडनाव काढल्यानंतर झाले अनेक बदल? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

अरबाज याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर आणि 'खान' आडनाव काढायचा निर्णय घेतल्यानंतर मलायकाला अनेकांनी दिला 'हा' सल्ला.. सध्या खासगी आयुष्यामुळे मलायका तुफान चर्चेत...

Malaika Arora हिच्या आयुष्यात 'खान' आडनाव काढल्यानंतर झाले अनेक बदल? अभिनेत्रीकडून मोठा खुलासा
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 12:13 PM

मुंबई : अभिनेत्री मलायका आरोरा आज तिच्या आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. मलायकाने जेव्हा अभिनेता अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी मलायकाला अनेक सल्ले दिले. पण मलायकाने कायम तिच्या मनाचं ऐकलं आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता अभिनेता आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदाने जगणारी मलायतका कायम तिच्या आयुष्याबद्दल चाहत्यांना सांगत असते. आता नुकताच झालेल्या एका कर्यक्रमात मलायकाने पहिला पती, कुटुंब आणि खान आडनावाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ज्यामुळे मलायका सध्या तुफान चर्चेत आली आहे. मलायका आणि अरबाज यांनी १९९८ साली लग्न केलं. त्यानंतर लग्नाच्या १९ वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात मलायकाला विचारण्यात आलं की, ‘तुझ्या यशाचं श्रेय कायम खान कुटुंबाला दिलं जातं? यामध्ये किती सत्य आहे?’ यावर मलायका म्हणाली, ‘खूप फायदा झाला. पण मला नाही वाटत की मी त्याच सत्यासोबत जगू शकली असती. माझ्या नावापुढे एक प्रसिद्ध आडनाव लागलं. खान आडनाव असल्यामुळे माझ्यासाठी अनेक दरवाजे खुले झाले..’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अखेर माझ्या लक्षात आलं मला माझ्या आडनावावर काम करायचं आहे आणि इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. रोज मला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. जेव्हा माझ्या नावापुढे खान आडनाव लागलं तेव्हा देखील मी काम करत होती आणि जेव्हा मी त्या नावाशिवाय माहेरी आली तेव्हा देखील मी कामच करत होती’

‘घटस्फोटानंतर अनेकांनी मला सांगितलं की खान आडनाव सोडण्याची सर्वात मोठी चूक करत आहेस. अनेकांनी मला सांगितलं त्या एका आडनावाचं महत्त्व फार मोठं आहे. माझ्या मनात सासरच्या लोकांसाठी प्रचंड प्रेम आहे. त्यांनी देखील मला प्रेम दिलं. एक मुलगा देखील आहे. कुटुंब आहे. पण मला स्वतःच्या पायावर उभं रहायचं होतं.. ‘

स्वतःच्या आरोरा आडनावाबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त आडनावबद्दल नाही तर, आडनाव सोडून पुन्हा माहेरच्या नावावर आल्यामुळे मला कळालं की, मी आयुष्यात काहीही करु शकते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या मलायकाने तिच्या आयुष्याबद्दल केलेले मोठे खुलासे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

मलायका आणि अरबाज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला. पण मुलासाठी अनेकदा मलायका आणि अरबाज एकत्र येतात. घटस्फोटानंतर मलायकाने अर्जुनचा हात धरला. जेव्हा अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या नात्याची कबुली सर्वांसमोर दिली तेव्हा अनेकांनी टीका केली. पण अर्जुन आणि मलायका कोणत्याही गोष्टीला अधिक महत्त्व न देता फक्त आणि फक्त त्यांच्या भावनांना महत्त्व दिलं. आता दोघे अनेकांना कपल गोल्स देतात.

Non Stop LIVE Update
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.