AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora: 52 वर्षीय मलायका अरोरा दुसऱ्यांदा थाटणार संसार? बॉयफ्रेंडसोबतच्या त्या व्हिडीओनंतर चर्चांना उधाण

Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड हर्ष मेहता यांना कुटुंबीयांसोबत मिळून ओणम साजरा केला आहे.

Malaika Arora: 52 वर्षीय मलायका अरोरा दुसऱ्यांदा थाटणार संसार? बॉयफ्रेंडसोबतच्या त्या व्हिडीओनंतर चर्चांना उधाण
Malaika Arora and Harsh MehtaImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 27, 2026 | 1:45 PM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मलायका आणि डायमंड व्यावसायिक हर्ष मेहता यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. आता दोघेही एका खास प्रसंगी एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 26 ऑगस्ट रोजी मलायकाने तिच्या आईच्या घरी हर्ष मेहतासोबत ओणम साजरा केला. यावेळी मलायकाच्या घरी हर्षची उपस्थिती पाहून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबाबत चर्चा होत आहेत. वयाच्या 52 व्या वर्षी मलायका पुन्हा संसार थाटणार की काय, असा प्रश्न नेटकरी करत आहेत.

ओणमच्या निमित्ताने हर्ष मेहता मलायकाच्या आईच्या घरी पोहोचला होता. पापाराझींनी त्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला, मात्र हर्ष कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मलायका आणि हर्षच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. मलायका आणि हर्ष एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोघांना याआधीही विविध ठिकाणी एकत्र पाहण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. मार्च 2026 मध्येही मलायका हर्षसोबत राजस्थानातील एका मंदिरात दिसली होती.

पहा व्हिडीओ-

हर्ष मलायकाच्या आईच्या घरी ओणम साजरा करण्यासाठी पोहोचल्याचं समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी लगेचच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू केली. काहींनी ‘रिश्ता पक्का झाला वाटतंय’, ‘शादी कब?’ अशा प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी दोघांची जोडी पसंत असल्याचं म्हटलं. काही नेटकऱ्यांनी तर ओणमच्या निमित्ताने हर्षने मलायकाच्या आईची भेट घेतल्यामुळे लग्नाबाबत कुटुंबात चर्चा झाली असावी, असा अंदाजही व्यक्त केला. मात्र, मलायका अरोरा किंवा हर्ष मेहता यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

मलायका आणि हर्ष यांच्या वयात जवळपास 17 ते 19 वर्षांचं अंतर आहे. मलायका यापूर्वी अभिनेता अरबाज खानसोबत विवाहबद्ध झाली होती. दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान खान हा मुलगा आहे. मलायका आणि हर्ष यांचं नातं अधिकृतपणे कधी जाहीर होणार किंवा दोघे लग्नाचा निर्णय घेणार का, याबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती नाही. मात्र, आईच्या घरी सण साजरा करण्यासाठी हर्षची झालेली उपस्थिती त्यांच्या नात्याबाबतच्या चर्चांना नक्कीच नवं कारण मिळवून देत आहे.

Follow Us
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....