AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आयुष्याच्या त्या टप्प्यावर..”, मलायका अरोराने काढलेल्या नवीन टॅटूची चर्चा; नक्की अर्थ काय? 

मलायका अरोराने अलीकडेच एक नवीन टॅटू काढला आहे. ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. एवढंच नाही तर तिने त्याचा अर्थही सांगितला आहे.

आयुष्याच्या त्या टप्प्यावर.., मलायका अरोराने काढलेल्या नवीन टॅटूची चर्चा; नक्की अर्थ काय? 
Malaika Arora tattooImage Credit source: instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Apr 03, 2025 | 10:33 AM
Share

बॉलिवूडमधील असे अनेक घटस्फोट चर्चेत राहणारे आहेत. पण त्यातील एक घटस्फोट जो कायम चर्चेत राहतो तो म्हणजे मलायका आणि अर्जुन कपूरचा.अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या टॅटूमुळे.

मलायकाच्या नवीन टॅटूची चर्चा 

मलायकाने आतापर्यंत अनेक टॅटू काढले आहेत. तिने पुन्हा एक नवीन टॅटू काढला, ज्याबद्दल ती बोलली आहे. मलायका अलीकडेच एका कार्यक्रमात गेली होती जिथे तिच्या नवीन टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मलायकाने तिच्या नवीन टॅटूबद्दल सांगितलं. मलायकाने स्वतः तिच्या टॅटूचा अर्थ सांगितला. ती म्हणाली की, हा टॅटू तिच्या आयुष्यात काहीतरी नवीन भर घालत आहे.

टॅटूबद्दल ती काय म्हणाली?

मलायका अरोराने एका मुलाखतीत तिच्या टॅटूबद्दल ती म्हणाली की, “माझ्यासाठी, आयुष्याच्या त्या टप्प्यावर टॅटू आले. मी हे टॅटू असेच नाही काढले आहेत. त्याचा एक काहीतरी अर्थ आहे. 2024 हे वर्ष माझ्यासाठी कठीण गेलं आहे.  मलायका अरोराने तिच्या हातावर ‘सब्र और शुकर’ लिहिलेल्या टॅटूचा काढला आहे. मलायकाने आता तिच्या टॅटूचा अर्थ सांगितला आहे. ती म्हणाले की सबर म्हणजे संयम आणि शुकर म्हणजे कृतज्ञता. गेल्या वर्षीच्या तुलनेत आज मी कुठे आहे याचा विचार करताना हे शब्द माझ्या मनात कायम असतात.”

2024 हे वर्ष मलायकासाठी खूप कठीण गेलं….

2024 हे वर्ष मलायकासाठी खूप कठीण गेले आहे. तिचे वडील अनिल मेहता यांचं निधन झालं.तर, दुसरीकडे, अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाला. वडिलांच्या निधनानंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठीशी उभा राहिला. कामाच्या बाबतीत बोलायचं झाले तर, मलायका सध्या रेमो डिसूझासोबत एका रिअॅलिटी शोची जज आहे. मलायका तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तिला खूप आवडही आहे. तिच्यामुळे शोला एक ग्लॅमर प्राप्त होतं.  मलायकाने अनेक रिअॅलिटी शोज जज केले आहेत.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!