AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 वर्षांचा मुलगा, 19 वर्षांनी लहान तरुणाशी नातं; मलायकाने अखेर ट्रोलिंगवर सोडलं मौन

अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही काळापासून बिझनेसमन हर्ष मेहताला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. नुकताच हर्ष मलायकाच्या मुलासोबतही दिसला. यावरून तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोलसुद्धा करण्यात येतं. या ट्रोलिंगवर मलायकाने प्रतिक्रिया दिली आहे.

23 वर्षांचा मुलगा, 19 वर्षांनी लहान तरुणाशी नातं; मलायकाने अखेर ट्रोलिंगवर सोडलं मौन
मलायका अरोरा, अरहान खान आणि हर्ष मेहताImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 3:52 PM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या डेटिंग लाइफची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आधी तिने अभिनेता अर्जुन कपूरला डेट केलं. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यावरून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. काही वर्षे डेट केल्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं. आता पुन्हा एकदा मलायका तिच्यापेक्षा वयाने 19 वर्षांनी लहान असलेल्या उद्योगपतीला डेट करत असल्याने चर्चेत आली आहे. हिरे व्यापारी हर्ष मेहतासोबत तिच्या रिलेशनशिपची बातमी समोर आल्यापासून नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलं आहे. या सर्व ट्रोलिंगवर अखेर मलायकाने मौन सोडलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत मलायकाने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल तिचं मत व्यक्त केलं. तिने स्पष्ट केलं की, इंटरनेटच्या या जगात तिने स्वत:भोवती एक सीमारेषा तयार केली आहे. यामुळे ती बाहेरच्या गोंगाटापासून स्वत:ला सुरक्षित ठेवू शकते आणि त्याचा परिणाम स्वत:वर होऊ देत नाही. “इंटरनेटवर खूप गोंधळ असतो. पण ते नेहमीच योग्य किंवा समंजस असेल असं नाही. हे लक्षात ठेवून मी माझ्या आंतरिक आनंदाचं रक्षण करते. या दोन्हींमध्ये फरक आहे. इतक्या वर्षांत आता मी हे शिकलेय की जर तुम्ही सतत लोकांच्या मतांपुढे तुमची मन:शांती पणाला लावली, तर तुम्हाला कधीही आंतरिक शांती मिळणार नाही. मी एक सीमारेषा तयार करायला शिकले आहे”, असं मलायका म्हणाली.

मलायका आणि तिच्या मुलासोबत हर्ष मेहता-

View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

याविषयी तिने पुढे सांगितलं, “माझ्याबद्दल सोशल मीडियावर बोललेलं प्रत्येक वाक्य मी आता वाचत नाही. मी प्रत्येक मत माझ्या मनाला लावून घेत नाही. मी माझ्या खऱ्या आयुष्यावर, माझ्या कामावर, माझ्या कुटुंबावर, माझ्या दैनंदिन जीवनावर आणि ज्या गोष्टी मला खऱ्या अर्थाने आनंद आणि शक्ती देतात, त्यांच्यावर अवलंबून राहते. याच गोष्टी माझे पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवतात. खरं सांगायचं तर वयानुसार आपला दृष्टीकोनसुद्धा बदलतो.”

मलायकाला तिच्या डेटिंग लाइफबद्दल अनेकदा ट्रोल केलं जातं. कमी वयाच्या मुलांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावरून तिच्यावर टीका केली जाते. याबद्दल मलायका स्पष्ट म्हणाली, “तुम्ही प्रत्येक लहानसहान आवाजावर प्रतिक्रिया देणं थांबवता. तुमच्या लक्षात येतं की ट्रोलिंग हे ऐकणाऱ्यापेक्षा ते करणाऱ्या व्यक्तीबद्दलच जास्त सांगतं. आज माझा आनंद स्वत:ला चांगल्या प्रकारे ओळखण्यात आणि त्या जाणिवेत स्थिर राहण्यात आहे. तोच माझा आनंद आहे. तो वैयक्तिक आहे, तो संरक्षित आहे आणि तो कोणत्याही सार्वजनिक चर्चेसाठी नाही.”

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं