Malaika Arora Real Age | मलायका अरोरा 57 वर्षांची? नेटकऱ्यांनी अर्जुन कपूर यालाही ओढले वादात, थेट म्हणाले…
मलायका अरोरा हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच एक जबरदस्त असे फोटोशूट केले होते. या फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडीओ मलायका हिने इंस्टावर शेअर केला होता. नेहमीच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना मलायका अरोरा ही दिसते.

मुंबई : मलायका अरोरा हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मलायका अरोरा ही तिच्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायका अरोरा ही 49 वयाची असूनही जबरदस्त बोल्ड आहे. विशेष म्हणजे मलायका अरोरा ही बोल्डनेसमध्ये अनेक बाॅलिवूड (Bollywood) अभिनेत्रींना तगडी टक्कर देखील देते. मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून ती बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. विशेष म्हणजे हे दोघे अनेकदा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये स्पाॅट होतात. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच्यापेक्षा मलायका अरोरा ही वयाने लहान आहे.
मलायका अरोरा ही गेल्या काही वर्षांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनेकदा अर्जुन कपूर आणि तिच्या नात्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. काही दिवसांपूर्वीच एका पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता, या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हा चक्क मलायका हिचे केस ओढताना दिसला.
सध्या सोशल मीडियावर एक जुना साजिद खान याच्या शोमधील व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही दिसत असून साजिद खान हा चक्क मलायका अरोरा हिला म्हणतो की, आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करून कसे वाटते? यामध्ये पुढे सांगितले जाते की, मलायका अरोरा ही अरबाज याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.
गूगलवर मलायका अरोरा हिचे वय 49 असे दाखवले जाते. मात्र, साजिद खान याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा हिचे वय अरबाज खान याच्यापेक्षा दोन वर्षे मोठे म्हणजेच 57 असे सांगितले गेले. या व्हिडीओपेक्षाही आता अधिक चर्चा ही रंगली आहे की, 57 वयामध्येही कोणी इतके कसे बोल्ड आणि ग्लॅमरस असू शकते. अर्जुन कपूर याचे वय हे 37 आहे आणि मलायकाचे 57 यावरूनही आता चर्चा रंगत आहेत.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटले की, मला वाटते की हा फक्त मजाक आहे. दुसऱ्याने लिहिले की, आता विचार करा की, मलायका अरोरा ही तिच्या वयापेक्षा किती जास्त लहान असलेल्या मुलाला डेट करत आहे. मलायकाच्या वयाबद्दल आता विविध चर्चा जोरदार रंगताना दिसत आहेत. मलायका अरोरा हिने काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर याचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, त्यानंतर तिच्यावर टिका करण्यात आली.
