‘त्या’ फोटोने रातोरात झाली प्रसिद्ध, पण… ममता कुलकर्णीच्या स्फोटक फोटोची कहाणी काय ?
अभिनेत्री ममता कुलकर्णी आता ममता कुलकर्णी नाही. तिने संन्यास घेतला आहे आणि आता ती श्री यमाई ममता नंद गिरी झाली आहे. एकेकाळी ममतापूर्णपणे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिच्याशी निगडीत अनेक वाद, कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत, पण तिच्या एका फोटोने तर प्रचंड खळबळ माजली. तो फोटो समोर येताच ती प्रसिद्ध तर झाली पण लवकरच बदनामही झाली.

एकेकाळी बॉलिवूडचा मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ममता भारताबाहेरच राहत होती. मात्र आता महाकुंभच्या निमित्ताने ती भारतात परतली असून ममताने संन्यास घेतला आहे. आता ममताला नवीन नावंही मिळालं असून ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाईल. तिने किन्नर आखाड्यातून दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला आहे. ममता एकेकाळी ममता ही पूर्णपणे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिच्याशी निगडीत अनेक वाद, कॉन्ट्रोव्हर्सीज आहेत, पण तिच्या एका फोटोने तर प्रचंड खळबळ माजली. तो फोटो समोर येताच ती प्रसिद्ध तर झाली पण लवकरच बदनामही झाली.
ममताने आता बॉलिवूड कायमचे सोडले आहे, पण एक काळ असा होता की तिची कीर्ती गगनाला भिडली होती. ममताने 1992 मध्ये तिरंगा या चित्रपटातून पदार्पण केले. तिरंगा हिट झाला आणि ती रातोरात स्टार झाली. यानंतर तर तिच्या घराबाहेर दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 1993 मध्ये, तिने आशिक आवारा साइन केले आणि त्याच वर्षी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) आणि लक्स फेस ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.
‘स्टारडस्ट’ मॅगझीन आणि तो कव्हर फोटो
त्यानंतर ममता कुलकर्णी हिने वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण-अर्जुन आणि सबसे बड़ा खिलाड़ी अशा अनेक चित्रपटांत काम केलं. तिच्या आयुष्यात, करिअरमध्ये सगळं काही ठीक सुरू होतं, पण त्यानंतर तिच्या एका निर्णयाने संपूर्ण आयुष्यचं बदललं. तिने केलेल्या एका फोटोशूटमुळे तिच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वादग्रस्त कव्हर पेजसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्टारडस्ट’ मॅगझीनसाठी ममताने एक टॉपलेस फोटोशूट केलं आणि सगळंच बदललं.

1993 च्या ‘स्टारडस्ट’ मॅगझीनसाठी ममताने टॉपलेस फोटोशूट करून प्रचंड खळबळ माजवली. तिचा हा टॉपलेस फोटो त्यावेळेस अतिशय आक्षेपार्ह होता आणि त्या वेळी या फोटोशूटवरून बराच वाद झाला होता. मॅगझिनचा अंक प्रकाशित होताच ममताचे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते. तिच्या या लूकची बॉलिवूडमध्येही खूप चर्चा झाली. असे म्हटले जाते की ममता कुलकर्णीचा तो टॉपलेस फोटो पाहून त्यावेळी अनेक बी-ग्रेड दिग्दर्शकांनी तिला आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर देण्यास सुरुवात केली होती. ममताचा फोटो रातोरात व्हायरल झाला. खरंतर तोपर्यंत ममता ही चित्रपटांमध्ये साध्या मुलीची भूमिका करत होती. अशा परिस्थितीत अशा फोटोशूटमुळे तिच्या इमेजचे खूप नुकसान झाले. एकाच फोटोमुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली खरी पण ती लवकरच ती प्रसिद्धी बदनामीत बदलली.
