AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्रीची नवी मालिका; घटस्फोटावर करणार भाष्य

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत ती आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

'मुलगी झाली हो'मधील अभिनेत्रीची नवी मालिका; घटस्फोटावर करणार भाष्य
'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकताImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 10, 2023 | 11:20 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं आहे. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यांसारख्या मालिकांमधून स्टार प्रवाह वाहिनीने वेगळे विषय हाताळले आहेत. आता मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात येणार आहे.

या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. या कथा आणि आणि ही पात्र रसिकांना आवडण्यामागचं कारण हेच आहे की त्या खऱ्या वाटतात आणि तो प्रवास एक नवी ऊर्जा देतो. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या मालिका एक उत्तम उदाहरण आहेत. अश्याच एका महत्त्वाच्या विषयावर आता स्टार प्रवाह वाहिनी मालिका घेऊन येतेय आणि तो विषय आहे घटस्फोट.”

“घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. आयुष्याच्या प्रवासात या एका अपघातानंतर बराच प्रवास असतो जो सहज सुखकर असू शकतो हे दाखवणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे,” असं ते पुढे म्हणाले.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत ती आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. इतरांना भरभरुन आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे.

या नव्या भूमिकेविषयी सांगताना दिव्या म्हणाली, “मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आलेय त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे.”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ही नवी मालिका येत्या 8 मे पासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?