‘मानसी साळवी’चे 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेत साकारणार भूमिका!

झी मराठी वाहिनीवर 31 डिसेंबर पासून 'काय घडलं त्या रात्री?' हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

'मानसी साळवी'चे 13 वर्षांनी मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक, या मालिकेत साकारणार भूमिका!
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:43 PM

मुंबई : झी मराठी वाहिनीवर 31 डिसेंबर पासून ‘काय घडलं त्या रात्री?’ हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास 13 वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी साळवीची मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री होणार आहे.  मानसीने याआधी झी मराठीवरील सौदामिनी आणि नुपूर या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. (Manasi Salvi’s comeback on Marathi television after 13 years)

झी मराठीवरील गाजलेल्या ‘असंभव’ या सुप्रसिद्ध मालिकेत मानसीने साकारलेली शुभ्राची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पंसंतीस पडली होती. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत मानसी एका प्रामाणिक महिला आय.पी.एस. ऑफीसरच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या हत्ये मागील कोडं सोडवण्यासाठी तिची नेमणूक केली जाते. ही हूशार व चलाख पोलिस ऑफीसर तिच्या पद्धतीने प्रत्येकासमोर निडरपणे उभी राहते,  राजकारण वा कुणासमोरही न झुकता वर्दीशी एकनिष्ठ राहून तपास करते.

तिच्या या नवीन व्यक्तिरेखेबद्दल बोलताना मानसी म्हणाली,”प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं कि त्याला एक अशी दमदार भूमिका साकारायला मिळावी जी त्याला आपलीशी वाटेल. ‘काय घडलं त्या रात्री?’ या मालिकेत आय.पी.एस. ऑफिसर रेवती बोरकरची भूमिका साकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. ती एक कणखर अधिकारी आणि एक प्रेमळ आई अशा दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कायदा, आदेश आणि न्याय यांचं पालन आणि आदर करत पोलीस खातं, नागरिक, राज्य आणि आपला देश यांच्याप्रती आपल काम चोख बजावण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

ती  एक तत्वनिष्ठ आयपीएस ऑफिसर जी बदलत्या परिस्थितीत देखील आपल्या तत्वांशी एकनिष्ठ असते. 13 वर्ष उलटली असली तरी देखील आजही प्रेक्षकांना माझी कारकीर्द लक्षात आहे आणि  माझ्या आगामी भूमिकेला देखील तितकाच आपुलकीने प्रोत्साहन देत आहेत यासाठी मी प्रेक्षकांची ऋणी आहे.”

संबंधित बातम्या : 

Webseries | मराठीतील नव्या चित्तथरारक वेब सीरीजचे चित्रीकरण सुरु!

सिनेनिर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!

(Manasi Salvi’s comeback on Marathi television after 13 years)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.