Webseries | मराठीतील नव्या चित्तथरारक वेब सीरीजचे चित्रीकरण सुरु!

लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेब सीरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले.

Webseries | मराठीतील नव्या चित्तथरारक वेब सीरीजचे चित्रीकरण सुरु!

मुंबई : लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेब सीरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसमुळे वेब सीरीजला सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग वेबसीरीजकडे वळला आहे. (filming of new webseries in Marathi begins)

नवोदित दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ याने नव्या वेब सीरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट’, ‘चंद्रप्रकाश यादव’ आणि ‘प्रशांत सावंत’ हे या वेब सीरीजची निर्मिती करत आहेत. या वेब सीरीजचे सहनिर्माते प्रशांत मधुकर राणे आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

अंजली, दुहेरी, नकळत सारे घडले या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक ‘तेजस लोखंडे’ त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, ”ही माझी पहिलीच वेब सीरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे.  या वेब सीरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेब सीरीज करण्यापूर्वी मी ब-याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेब सीरीजसाठी  देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत. हीच सदिच्छा.

या वेब सीरीजचे निर्माते चंद्रप्रकाश यादव आपल्या पहिल्या वेब सीरीजविषयी सांगतात, ”ही माझी पहिलीच वेब सीरीज आहे. तेजस लोखंडे हा अनुभवी दिग्दर्शक आहे तर अजिंक्य ठाकूर हा लेखन कौशल्यात तरबेज आहे. आणि सहनिर्माते प्रशांत राणे हे या वेब सीरीजचे प्रोजेक्ट प्रमुख आहेत. अशी संपूर्ण टिम या वेब सीरीजसाठी कार्यरत आहे. त्यामुळे मी फार उत्सुक आहे.”
चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत ह्यांची निर्मिती असलेली, तेजस लोखंडे दिग्दर्शित आणि अजिंक्य ठाकूर लिखित या नव्या मराठी वेब सीरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू झाले आहे. यात कोणकोणते कलाकार असणारं आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.

संबंधित बातम्या : 

OTT Releases This Week | या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना, पाहा कोणते चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!

Tandav Poster | ‘तांडव’ वेब सीरीजचे पोस्टर प्रदर्शित, सैफ अली खानचा जबरदस्त लुक!

(filming of new webseries in Marathi begins)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI