
एखाद्या चित्रपटातील भूमिका बाखूबी निभावणारी सुंदर अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. तिचे आजोबा नेपाळचे २२वे पंतप्रधान होते. मनीषाने १९८९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याची तुफान चर्चा सुरु होती.

एकेकाळी मनीषा कोईराला ही एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या प्रेमात अखंड बुडाली होती. तिचे प्रेम प्रकरण प्रचंड गाजले होते. पण अचानक त्यांचा ब्रेकअप झाला.

मनीषाने १९९६ साली 'अग्नि साक्षी' या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले होते. त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

‘खामोशी’ चित्रपटात दोघांनी पुन्हा एकत्र काम केले. काही दिवसानंतर मनीषा आणि नानांनमध्ये भांडण सुरु झाले आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.

मनीषाने १९ जून २०१०मध्ये नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहलसह लग्न केले होते. तिचे हे लग्न देखील फार टिकले नाही.