तुम्हाला आवडत नसेल तर..; ‘ॲनिमल’वर होणाऱ्या टीकेबाबत मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. मात्र त्या चित्रपटावर बरीच टीकासुद्धा झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता मनोज वाजपेयीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्हाला आवडत नसेल तर..; ‘ॲनिमल’वर होणाऱ्या टीकेबाबत मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया
मनोज वाजपेयी आणि रणबीर कपूरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 2:46 PM

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. तगडा गल्ला जमवण्यात जरी हा चित्रपट यशस्वी ठरला असला तरी सोशल मीडियावर अनेकांनी त्यातील सीन्स, गाणी, डायलॉग्स यांवरून तीव्र आक्षेप नोंदवला होता. रणबीर कपूरच्या या चित्रपटावर आता अभिनेता मनोज वाजपेयीने मत मांडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोजने ‘ॲनिमल’ हा चित्रपट मनोरंजक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे त्याने ‘कांतारा’, ‘RRR’ आणि ‘आर्टिकल 370’ या चित्रपटांचंही कौतुक केलंय.

मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, “माझे विचार याबाबत खूप स्पष्ट आहेत. जर अनेक लोकांना एखादा चित्रपट आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्यात चुकीचं काय आहे? चित्रपट प्रदर्शित होतो, त्याचा व्यवसाय होतो आणि गोष्टी पुढे सरकतात. मिळवलेला पैसा निर्मात्यांच्या खिशात जातो. जर तुम्हाला तो चित्रपट पहायला नसेल तर पाहू नका. जर एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत नसाल, तर ते न बघणंच ठीक असतं. पण त्या चित्रपटाच्या मार्गात अडथळे निर्माण करू नका. असं करून तुम्ही फक्त चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहात. जर तुमच्या कामात दुसऱ्या व्यक्तीने असाच अडथळा आणला तर? बंदीची मागणी न करता किंवा आंदोलनं न करता चर्चा झाली पाहिजे.”

हे सुद्धा वाचा

वादावर रणबीर काय म्हणाला होता?

‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ॲनिमल’ हा चित्रपट स्त्रीविरोधी आणि अत्यंत हिंसक असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटावर झालेल्या टीकेबद्दल रणबीरनेही प्रतिक्रिया दिली होती. “या चित्रपटाबद्दल काही जणांना समस्या होती पण माझ्या मते जे प्रेम, यश आणि बॉक्स ऑफिसचे आकडे या चित्रपटाला मिळाले आहेत, त्यावरून हे सिद्ध होतंय की चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीच नाही. चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही,” असं तो चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये म्हणाला होता.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.