Femina Miss India 2020 | तेलंगणाच्या मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

Nupur Chilkulwar

|

Updated on: Feb 11, 2021 | 11:36 AM

तेलंगणाच्या मानसा वाराणसीला मिस इंडिया 2020 चा खिताब मिळाला.

Femina Miss India 2020 | तेलंगणाच्या मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज
Mansa-Varanasi Miss India 2020

मुंबई : मुंबईत बुधवारी रात्री फेमिना मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेचं आयोजन करण्यात आलं होतं (Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020). जिथे तेलंगणाच्या मानसा वाराणसीला मिस इंडिया 2020 चा खिताब मिळाला. टॉप 3 मध्ये यावर्षी मिस इंडिया 2020 चा खिताब मानसा वाराणसीला मिळाला. तर मिस इंडिया वर्ल्ड 2020 मान सिंहला देण्यात आला. तर, फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली. शो दरम्यान, सर्व कंटेस्टेंट उत्साहित होते (Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020).

View this post on Instagram

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

COVID-19 महामारीमुळे, मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आलं होतं. हे मिस इंडिया 2020 चं 57 व आयोजन होतं, जे काल संपलं.

मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा खिताबही आपल्या नावे केला. यादरम्यान, मानसा वाराणसी, मान सिंह, मनिका शोकंद एकमेकींसोबत या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसून आल्या.

मिस इंडिया 2020 च्या दिमाखदार फिनालेचं होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केलं. तर यावेळी अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या फिनालेला उपस्थित होती (Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020).

Mansa-Varanasi Crowned As Miss India 2020

संबंधित बातम्या :

Ira Khan Video | मी ठीक आहे, पण मला रडू कोसळतंय, आमीरची मुलगी इरा खानचं डिप्रेशनशी द्वंद्व

एक पोस्ट शेअर करण्यासाठी ‘प्रियांका चोप्रा’ कमावते तब्बल इतके रूपये !

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI