Hindavi Patil : मुली ‘पाटील’ आडनावाच्या प्रेमात, नेमकं कारण काय! हिंदवीचा मोठा खुलासा
Hindavi Patil : हिंदवी पाटील हिला आज कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. भन्नाट डान्सच्या जोरावर तिने चाहत्यांना देखील थिरकायला लावलं. अशात एका मुलाखतीत हिंदवी हिने तिच्या क्षेत्राबद्दल आणि पाटील आडनावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे... जाणून घ्या काय म्हणाली हिंदवी पाटली...

Hindavi Patil : गौतमी पाटील आणि राधा पाटील हिच्यानंतर हिंदवी पाटील देखील चर्चेत आली. हिंदवी हिचा कार्यक्रम पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमते. दरम्यान एका मुलाखतीत हिंदवी हिने तिच्या क्षेत्राबद्दल आणि पाटील नावाबद्दल देखली मोठं वक्तव्य केलं आहे. सांगायचं झालं तर, गौतमी पाटील, राधा पाटील यांच्याप्रमाणे हिंदवी पाटील हिचं नाव देखील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून घेतलं जातं. पूर्ण महाराष्ट्रात पाटील म्हणून या तिघी प्रसिग्द आणि लोकप्रिय आहे. पण ज्यावेळी पाटील हे नाव लावलं जातं, तेव्हा त्यांच्या प्रसिद्धीत वाढ होते, असं म्हटलं जातं..
पण पाटील म्हणजे गावचे पाटील ते रॉयल आहेत, ते अशी कामं करत नाहीत. अनेकांची अशी समज असताना तु्म्ही तिघी पाटील आडनावाने कशा या क्षेत्रात लोकप्रिय झाल्या… असा प्रश्न नृत्यांगना हिंदवी पाटील हिला विचारण्यात आला.. यावर हिंदवी हिने मोठा खुलासा केला आहे… पाटील म्हटलं की, स्त्रीयांनी घरात बसलं पाहिजे, कारण या क्षेत्रात काम केल्याने कुटुंबाची प्रतिमा मलिन होते, अशी अनेकांची समज आहे.
याप्रश्नाचं उत्तर देत हिंदवी पाटील म्हणाली, ‘पहिली पाटील जेव्हा प्रसिद्धी झोतात आली, तेव्हा तिने स्वतःचं नाव बदललं नाही. ती झाली फेमस झाली किंवा फेमस व्हायचं म्हणून तिन सगळ्या गोष्टी केल्या… असं काहीही झालं नाही. पण की प्रसिद्धी झोतात आली. दुसरी पाटील (राधा पाटील) सुद्धा प्रसिद्ध झाली..’
‘आडनावात पाटील असलं म्हणून काय झालं. तिला माहितीये तिचं घर कसं चालवायचंय. तुम्ही सगळे येऊन खाऊ नाही घालणार. आम्ही तिघी खान्देशी आहोत आणि त्या भागात पाटील आडनाव असणं फार मोठी गोष्ट नाही… आजकाल मुलींनी ट्रेन्ड म्हणून देखील स्वतःच्या नावापुढे पाटील आडनाव लावण्यास सुरुवात केली आहे. अशा अनेक मुली मी पाहिल्या आहेत.’ पण यावेळी पाटील आडनाव ट्रेन्ड म्हणून लावणाऱ्या मुलींबद्दल सांगण्यास हिंदवी हिने स्पष्ट नकार दिला.
पाटील आडनावावर हिंदवी म्हणाली, ‘अशा अनेक मुली आहेत ज्यांनी स्वतःचं आडनाव वेगळं असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावापुढे पाटील आडनाव ट्रेन्ड म्हणून लावलं आहे. पाटील आडनाव लावल्यानंतर त्या मुलींना असं वाटतं, त्यांना शो, इव्हेन्ट जास्त मिळतील.. त्या ट्रेन्डनुसार चालतात. पण असं काहीही नसतं. तुम्ही आज जे काही करता ते टिकवण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. आज तुम्ही ट्रेडिंगला आहात म्हणून मी मी करुन चालणार नाही. या क्षेत्रात माझं चैथं वर्ष आहे आणि मी खूप लोकं आलेली आणि गेलेली पाहिली आहेत… असं देखील हिंदवी पाटील म्हणाली. हिंदवी कायम तिच्या भन्नाट डान्समुळे चर्चेत असते.
