Radhe | अरारारारा… खतरनाक! प्रवीण तरडे म्हणतो, सलमानसाठी ‘राधे’ केला, पण…

सलमान भाईसोबत रिलेशन्स निर्माण करायचे होते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता.' असं प्रवीण म्हणाला. (Pravin Tarde Salman Khan Radhe)

Radhe | अरारारारा... खतरनाक! प्रवीण तरडे म्हणतो, सलमानसाठी 'राधे' केला, पण...
सलमान खान, प्रवीण तरडे
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 11:09 AM

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या ‘राधे’ चित्रपटावर ‘भाईजान’चे चाहते खुश आहेत, मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांकडून चित्रपटाची चिरफाड केली जात आहे. ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) चित्रपटाची सोशल मीडियातून खिल्ली उडवली जात आहे. त्यातच प्रख्यात अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde) यानेही आपला अनुभव व्यक्त केला आहे. (Marathi Actor Pravin Tarde tells why he signed Salman Khan starrer Radhe Movie)

‘राधे’ चित्रपटात अभिनेता प्रवीण तरडेने दगडू दादा ही गुंडाची भूमिका साकारली आहे. मात्र लहानशी व्यक्तिरेखा साकारण्यावरुन तरडेचे चाहते नाराज झाले आहेत. ‘प्रवीण भाऊ, तू लहानशी भूमिका का केलीस?’ असा प्रश्न आपल्याला सोशल मीडियावर विचारला जात असल्याचे प्रवीण तरडे म्हणाला.

सलमान भाईसोबत रिलेशन्स

‘मी म्हणालो, की लहान सहान भूमिका साकारतच मी इथवर आलो आहे. भूमिकेच्या लांबी-रुंदीने मला फरक पडत नाही. मी कोणती व्यक्तिरेखा करत आहे, हे महत्त्वाचं. मला सलमान भाईसोबत रिलेशन्स निर्माण करायचे होते. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट होता. मला तो माणूस म्हणून आवडतो.’ असं प्रवीण म्हणाला.

कोण आहे प्रवीण तरडे?

44 वर्षीय प्रवीण तरडेने लिहिलेला आणि दिग्दर्शन केलेला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट प्रचंड गाजला आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटासोबतच फँड्री, अजिंक्य, देऊळ बंद, लग्न मुबारक यासारख्या सिनेमांमध्येही प्रवीण तरडेने भूमिका केल्या आहेत. ‘आरारारा… खतरनाक’ या स्टाईलसाठी तो फेमस आहे.

ओटीटीवर सलमानचा दबदबा

सलमान खानचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी 5’चा सर्व्हर क्रॅश झाला. सलमानने यापूर्वी झी स्टुडिओला हा चित्रपट 230 कोटीला विकला होता. पण जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कंपनीने पुन्हा एकदा यावर चर्चा केली आणि सलमानला 190 कोटींमध्ये डील करण्यास सांगितले. स्वत: सलमान देखील या चित्रपटाचा निर्माता आहे. सलमानचे वडील आणि प्रख्यात लेखक सलीम खान यांनीही राधे हा फार काही ग्रेट सिनेमा नसल्याचं म्हटलं होतं.

Imdb चे रेटिंग

इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच आयएमडीबीवर राधेला फ्लॉप म्हटले गेले आहे. आयएमडीबीवर चित्रपटाचे रेटिंग केवळ 2.0 होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला पसंती देण्यात आली असली, तरी आयएमडीबीवरील रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला आहे.

संबंधित बातम्या :

‘राधे’मध्ये दिशा पाटणीला पाहून खुश झाली टायगर श्रॉफची आई, फोटोवर कमेंट करत म्हणाली…

ओटीटीवर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरी IMDB रेटिंगमध्ये आपटला सलमान खानचा ‘राधे’, जाणून घ्या चित्रपटाची रेटिंग..

(Marathi Actor Pravin Tarde tells why he signed Salman Khan starrer Radhe Movie)

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.