AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपडपट्टीत गेलं बालपण, आज कोट्यवधींचा मालक; 26 वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्याने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न

मराठमोळ्या अभिनेत्याचं झोपडपट्टीत गेलं बालपण, पण आज कोट्यवधींचा मालक आहे 26 वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्याने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न... कोण आहे 'तो' अभिनेता?

झोपडपट्टीत गेलं बालपण, आज कोट्यवधींचा मालक; 26 वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्याने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न
| Updated on: Apr 29, 2026 | 1:17 PM
Share

झगमगत्या विश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी स्वतःच्या हिंमतीवर कलाविश्वात भक्कम ओळख निर्माण केली आणि आज हे अभिनेत्यांनी स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. अशाच अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे, मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ याने फक्त मराठी नाही तर, हिंदी सिनेविश्वात देखील स्वतःचं नाव फार मोठं केलं आहे. सिद्धार्थ याचं बालपण झोपडपट्टीत गेलं. तर वडिलांचं एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेत्याला 26 वर्ष लागली. पण आज सिद्धार्थ त्याच्या कुटुंबियांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

मुलाखतीत सिद्धार्थ म्हणला, ‘मी झोपडपट्टीमध्ये राहायचो… तो परिसर पूर्ण झोपडपट्टीचा होता… तेथे एक स्टेज होता. त्याठिकाण छोट्या – मोठ्या शिव्या देखील शिकलो. आमच्या परिसरात सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे व्हायचे. आम्ही प्रोजेक्टरवर सिनेमे पाहायचो… गणपतीचे 11 दिवस रोज नविन सिनेमा दाखवला जायचा…’

‘एके दिवशी प्रोजेक्टरवर माधुरी दीक्षित आणि आनिल कपूर यांचा ‘तेजाब’ सिनेमा दाखवला होता. ‘एक दो तीन’ गाणं आल्यानंतर प्रत्येकाने चिल्लर उडवण्यास सुरुवात केली. तेच चिल्लर आम्ही उचलले आणि सिनेमाचं तिकिट खरेदी केलं होतं… त्या दिवसांची गोष्टच काही वेगळी होती…’

एवढंच नाही तर, यावेळी सिद्धार्थ जाधव याने लहानपणीच्या आठवणी देखील ताज्या केल्या. अभिनेता म्हणाला, ‘माझे वडील लॅबमध्ये टेक्निशीयन होते आणि मला पोलीस अधिकारी व्हायचं होतं.. कारण माझ्या परिसरात अनेक पोलीस होते…’, मुंबईतील दादरचे रहिवासी असलेल्या सिद्धार्थ जाधव याने हे देखील उघड केलं की, त्यांनी त्याच परिसरात आपल्या आई-वडिलांसाठी घर विकत घेऊन अखेर आपले बालपणीचं स्वप्न पूर्ण केलं. हे स्वप्न साकार करण्यासाठी या अभिनेत्याला 26 वर्षे लागली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘दादरमध्ये राहणं माझं स्वप्न होतं. ज्या ठिकाणी आमचा जन्म झाला आणि आम्ही वाढलो. आम्ही माझ्या वडिलांच्या मित्राच्या घरी राहत होतो; ते घर आमचं नव्हतं. मला तिथे माझं स्वतःचं घर हवं होतं. 26 वर्षांनंतर मी हे स्वप्न पूर्ण केलं. मला माझ्या आई-वडिलांसाठी एक घर विकत घ्यायचं होतं आणि तिथे माझ्या वडिलांची नावाची पाटी लावलेली बघायची होती. माझं एक स्वप्न साकार झालं आणि माझे वडील खूप आनंदी झाले.’, असं देखील अभिनेता म्हणाला.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला