AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vivek Agnihotri statement on Varan Bhat : अशा लोकांमुळे मराठी माणसाला धोका.. वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रीवर भडकली मराठी अभिनेत्री !

का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची... त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का? असं विचारत तिने जोरदार टीकास्त्र सोडलं.

Vivek Agnihotri statement on Varan Bhat : अशा लोकांमुळे मराठी माणसाला धोका.. वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रीवर भडकली मराठी अभिनेत्री !
विवेक अग्निहोत्रींवर भडकली नेहा शितोळेImage Credit source: social media
| Updated on: Aug 19, 2025 | 1:01 PM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोश हिचे पती आणि द काश्मीर फाईल्स, द बंगाल फाईल्स यासारखे गाजलेले चित्रपट देणारे नामवंत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे या ना त्या कारणाने, कधी सिनेमांमुळे किंवा कधी त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत मराठी जेवणावर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे. मराठी लोकांचं जेवण म्हणजे गरिबांच जेवण असं म्हणत त्यांनी वरण-भात , कढी या पदार्थांवर टिप्पणी करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रय्तन केला. पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहे.

मराठी जेवणाबद्दल वाट्टेल ते बोलणाऱ्या, त्यांना गरिबाचंजेवण म्हणत हिणवणाऱ्या अग्निहोत्री यांच्यावर नेटीझन्स चांगलेच भडकले असून त्यांनी कमेंट्स करत पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नव्हे तर मराठी अभिनेत्री, लेखिका नेहा शितोळे हिनेही प्रतिक्रिया देत एक लाबंलचक पोस्ट लिहून अग्निहोत्री यांना थेट सुनावलं आहे. जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना “धडा शिकवण्याचा” आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार “वरण भाताची” किंमत आणि महत्त्व??? ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे असं म्हणत नेहा शितोळे हिने संताप व्यक्त केला आहे.

काय आहे नेहा शितोळेची पोस्ट ?

नेहाने तिच्या अध्कृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांचा तो बहुचर्चित व्हिडीओ शेअर करत त्यासोबत एक पोस्ट लिहीली आहे. हा व्हिडीओ अनेक पातळींवर मला त्रास देतोय, वैताग आणतोय असं म्हणत तिने पोस्टची सुरूवात केली आहे.

नेहाची पोस्ट जशीच्या तशी …

This video is pissing me off on so many levels… एक एक करून सांगते…

१. मराठी जेवणाविषयी पर्यायाने संस्कृती विषयी वाट्टेल ते बोलतोय हा माणूस… पुढे अजुन एका रील मधे हा म्हणतोय की मी सात्विक अन्न खातो… (Plant based food) (ह्याला सावजी खायला घाला आणि तांबडा पांढरा रस्सा पाजा एकदा) २. “गरिबांचं” किंवा “किसानांचं” जेवण म्हणजे वाईट असं म्हणून अन्नाचा, शेतकऱ्यांचा आणि भारताच्या जवळ जवळ २५% जनतेचा जी दारिद्र्य रेषेखाली राहते त्यांचा अपमान करतो आहे… ३. आपल्या सगळ्यांची लाडकी पल्लवी जोशी हसून हसून हा विनोद अभिमानाने सांगते आहे… आणि मुळात आम्ही भाज्या फक्त उकडत नाही… उकडीचे मोदक सिंपल नाहीत… पुरणपोळी सिंपल नाही… ४. ज्यांच्या घरी असं जेवण जेवतात, अश्या मुलीशी कसं लग्न करायचं हा विवेक अग्निहोत्री ला पडलेला प्रश्न आहे… ५. आणि हे सगळं YouTube च्या माध्यमातून करोडो लोकं बघतायत…

असं नेहाने लिहीलं आहे.

View this post on Instagram

A post shared by NEHA SHITOLE (@nehanachiket)

“हा माणूस काश्मीरचं सत्य आपल्या समोर आणतो आहे म्हणून आपण ह्याला डोक्यावर घ्यायचं? ज्या माणसाच्या मनात मुळात इतका भेदभाव आणि चुकीच्या धारणा आहेत भारतातल्या एका राज्याबद्दल, तिथे राहणाऱ्या आणि कष्ट करून कमावून खाणाऱ्या लोकांबद्दल तो काय दुसऱ्या राज्याचं सत्य सांगणार आपल्याला??? आता मराठीचा झेंडा मिरवणाऱ्या सगळ्यांनी ह्याचे सिनेमे Boycott करायला नकोत का? जसा स्टँड अप कॉमेडियन लोकांना “धडा शिकवण्याचा” आपण प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाल्याची पण ग्वाही दिली तसा आता ह्यांना कोण शिकवणार “वरण भाताची” किंमत आणि महत्त्व??? “असा सवाल तिने पोस्टमधून विचारला आहे.

“ह्या आणि अशा लोकांमुळे खरंतर मराठी भाषेला, माणसाला आणि पर्यायाने संस्कृतीला धोका आहे कारण हे पॉवर पोझिशन मध्ये बसून मराठी लोकांविषयी, भाषेविषयी वाईट, निंदनीय आणि अपमानकारक वक्तव्य करतात… त्यामुळे नाही म्हणलं तरी अनेक स्तरांवर लोकांच्या मनात कळत नकळत परिणाम होतो आणि आपण वरवर च्याच गोष्टी (theatre मिळत नाही, मराठी अनिवार्य नाही, मराठी कंटेंट OTT स्वीकारत नाही… इत्यादी) साठी भांडत बसतो…”

“का भीती वाटते आपल्याला आपल्यापेक्षा जास्त मोठ्या माणसाशी पंगा घ्यायची… त्यापेक्षा दुकानदारांना, कष्ट करून जगणाऱ्या गरीब परप्रांतियांना धमकावणं आणि मारणं सोपं आहे नाही का??” असं लिहीत नेहाने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.