AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवाचा बाजार मांडणाऱ्यांना कर्माची परतफेड करावी लागतेच..; अभिनेत्री प्राजक्ताचं रोखठोक मत

'मन उडू उडू झालं', 'पिंगा गं पोरी पिंगा' यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री प्राजक्ता परब नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत देवावरील श्रद्धा या विषयावर मोकळेपणे व्यक्त झाली. ती नेमकं काय म्हणाली, ते जाणून घ्या..

देवाचा बाजार मांडणाऱ्यांना कर्माची परतफेड करावी लागतेच..; अभिनेत्री प्राजक्ताचं रोखठोक मत
Prajakta ParabImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 04, 2026 | 10:19 AM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री प्राजक्ता परब ही तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. कोणत्याही विषयावर आपलं मत मांडताना ती अनेकदा थेट भूमिका घेताना दिसते. सध्या देव, श्रद्धा आणि त्याच्या नावावर होणाऱ्या व्यावसायिक किंवा राजकीय वापराबाबत प्राजक्ताने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. देवावर श्रद्धा असणं आणि त्या श्रद्धेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणं, या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचं तिच्या भूमिकेतून स्पष्ट होतं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता देवाच्या नावाचा व्यवसाय आणि राजकारणासाठी केला जाणारा वापर या मुद्द्यावर मोकळेपणे व्यक्त झाली. आजच्या काळात धार्मिक भावना आणि श्रद्धेशी संबंधित विषयांभोवती मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. अनेकदा देव, धर्म आणि श्रद्धेचा आधार घेऊन विविध प्रकारचे व्यावसायिक उपक्रम उभे केले जातात. त्याचप्रमाणे राजकीय चर्चांमध्येही धार्मिक मुद्द्यांना महत्त्व मिळताना दिसतं. अशा परिस्थितीत कलाकारांची मतंही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by MAJJA PINK (@majjapink)

‘मज्जा पिंक’ला दिलेल्या या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, “देव देव असतो. तो कुठल्या रुपात कधी येईल.. याबद्दल तुम्ही काहीच सांगू शकत नाही. देवाच्या नावावर व्यवसाय करणं चुकीचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर, मी शिर्डीला जाते. तिथेही व्यवसाय आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की, जी लोकं व्यवसाय करतायत ना.. ते त्यांचं कर्म आहे. ते चुकीचं आहे, पण ते त्यांचं कर्म आहे. शिर्डीला पण करतात.. कुठल्या देवस्थानाला करत नाहीत? आपल्या देशात आपण या गोष्टींवर नियंत्रण आणू शकत नाही. देवाच्या नावावर व्यवसाय.. राजकारण.. देवाच्या नावावर खूप गोष्टी खपवल्या जातात. मी लक्षच देत नाही. कारण आपल्या देशात आपण या गोष्टींवर बोलू शकत नाही. त्यामुळे फक्त त्याकडे दुर्लक्ष करा. ‘इग्नोराय नम:’ हीच सर्वोत्तम गोष्ट मी आता करू शकते.”

“मला नाही पटत, मी नाही जात. मी या गोष्टी करत नाही. फक्त माझं मत एवढंच आहे की तुम्ही जे कर्म करता, त्याची परतफेड या जन्मातच करावी लागते. पुढचा जन्म कोणी बघितलाय, माहीत नाही. एकवेळ देवही मानू नका. देव मानला नाही आणि तुम्ही मनातून खूप छान असाल.. तर तो स्वत: तुमच्यासाठी धावून येईल,” असं स्पष्ट मत तिने मांडलं. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Follow Us
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र