
अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आणि ‘मितवा’ सिनेमामुळे प्रार्थनाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आज प्रार्थना हिला कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या मुलांबद्दल मोठा खुलासा केला होता. प्रार्थना आणि तिच्या पतीने लग्नानंतर मुल न होऊ देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं. आता देखील अभिनेत्री नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या मुलांबद्दल आणि मुल न होऊ देण्याचं कारण सांगितलं आहे.
मुलाखतीत प्रार्थना हिला विचारण्यात आलं की, ‘आम्ही असं ऐकलंय की, तू 15 – 20 मुलांची आई आहेस आणि तू हे लपवून ठेवलंय’? यावर प्रार्थनानं दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे. प्रार्थना म्हणाली, ‘मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. मला 15 – 20 आहेत. एवढंच नाही तर, एका मुलगा तर लग्नाआधी देखील होता… त्याचं नाव गब्बर आहे. तो माझा सर्वात मोठा डॉग…’
‘आमच्या घरी सात डॉग्ज आहेत. फार्महाऊसवर पण अनेक श्वान आहेत. तसंच फार्महाऊसवर गायी आणि घोडे देखील आहे. 10 – 12 घोडे आहेत. हिच आमची मुलं. यांचाच सांभाळ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सगळ्यांचा सांभाळ करणं फार कठीण आहे.’
‘इच्छाशक्ती असली की हे शक्य होतं. आम्हाला मणुष्याची मुलं नकोत… त्यामुळे मी आणि माझ्या नवऱ्यानं ठरवलं आहे की, हिच आपली आपली मुलं आहेत.’ असा खुलासा प्रार्थना हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे.
प्रर्थना बेहरे हिच्या पतीचं नाव अभिषेक जावकरशी असं आहे. 14 नोव्हेंबर 2017 मध्ये प्रार्थना आणि अभिषेक यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.