AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीच्या प्रवासात सई ताम्हणकर सोबत घडलेली भयानक घटना, ‘त्याने मागून कंबरेला पकडलं अन्…’

अभिनेत्री सई ताम्हणकर हिची बसमध्ये एका मुलाने छेड काढली. त्यावर सईने मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत तेव्हा नेमकं काय घडलं यावर सई हिने सांगितलं आहे.

रात्रीच्या प्रवासात सई ताम्हणकर सोबत घडलेली भयानक घटना, 'त्याने मागून कंबरेला पकडलं अन्...'
Sai Tamhankar
| Updated on: Aug 10, 2026 | 3:16 PM
Share

अभिनेत्री सई ताम्हणकर हिला आज कोणत्यात ओळखीची गरज नाही. सई हिने फक्त मराठीच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका बजावत सई हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण हा प्रवास सई हिच्यासाठी सोपा नव्हता. एकदा बसमधून प्रवास करत असताना अभिनेत्रीची एका मुलाने छेड काढलेली. तेव्हा सई शांत राहिली नाही तर, तिने त्या मुलाला चांगलीच अद्दल घडवली. याबद्दल खुद्द सई हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सई हिची चर्चा रंगलेली आहे.

मुलाखतीत सई हिला ‘पुरुषांच्या वाईट प्रवृत्तीचा कधी सामना करावा लागला आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री तिच्यासोबत रात्रीच्या प्रवासात घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. सांगली ते मुंबई बसने प्रवास करताना सई हिची एका मुलाने छेड काढलेली.

मुलाखतीत सई म्हणाली, ‘करियरच्या सुरुवातीच्या काळात मी बसने प्रवास करायचे. सांगली ते मुंबई असा माझा प्रवास असायचा. मी रात्री बसमध्ये बसायचे आणि ती बस मला सकाळी मुंबईत पोहोचवायची. प्रवास करत असताना एक मुलगा माझ्या बसमध्ये मागे बसलेला. तो काही वेळ माझ्याकडे असाच बघत बसलेला…’

‘त्यानंतर काही वेळाने त्याने माझ्या कंबरेत हात टाकला… तेव्हा मी प्रचंड घाबरली होती. पण त्याला चांगलीच अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. मी त्याचा हात ओढला आणि मुरगळला आणि म्हणाले, पुन्हा हा हात पुढे आली की, हात मोडून मिळेल… त्या मुलाचा हात मुरगळ्यानंतर तो मोठ्याने ओरडला…’, सईने हा घडलेला धक्कादायक प्रकार मुलाखतीत सांगितला.

सई हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने दुनियादारी’, ‘गुलकंद’, ‘मिमी’, ‘तू ही रे’, ‘क्लासमेट्स’, ‘मानवत मर्डर्स’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. सोशल मीडियावर देखील  सई कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सई कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल...
शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट! 1 लाख 40 हजार शेतकरी पात्र; वेळ लागेल, पण... नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील?
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा..
मोठी खळबळ! ठाकरे गटाचा मोठा डाव; सहा फुटीर खासदारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या?
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळेंची खासदारांसह पंतप्रधानांच्या भेट
राजकीय घडामोडींना वेग! सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांच्या भेटीसाठी दाखल; व्हिडीओ आला समोर
बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही...
Chandrashekhar Bawankule | कुणबी प्रमाणपत्रावरून मोठा ट्विस्ट! बावनकुळेंच्या सूचनेनं एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही; अधिकाऱ्याचं पत्र आलं समोर