
अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यातील अनेक पैलू उलगडले आहे. घटस्फोटानंतर खासगी आयुष्याबद्दल अभिनेत्री पहिल्यांदा व्यक्त होताना दिसली. एवढंच नाही. आयुष्यात येणार पसंदीदा मर्द कसा असेल यावर देखील अभिनेत्री व्यक्त झाली आहे. ‘होणार सुन मी या घरची’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असताना तेजस्वी हिने अभिनेता शशांक केतकर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. आता अभिनेत्रीने प्रेमाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
तुझ्या आयुष्यात जे काही झालं, त्यामुळे प्रेमाकडे, नात्याकडे पाहण्याचा तुझा दृष्टीकोन बदलला आहे का? असा प्रश्न तेजश्री हिला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मला तसंच पुन्हा प्रेमात पडायचं आहे. मला ते पिंक वर्ल्ड पाहायचं आहे. मला तसेच सोशल मीडियावर छान फोटो टाकायचे आहेत. मला सगळं करायचं आहे. प्रेमाबद्दल माझा दृष्टिकोन बदललेला नाही…’
‘मला पुन्हा सांगायला आवडेल की मला माझ्या आयुष्यात एखाद्या माणसाला एवढं मोठं करायचं नाहीये. जो माझ्या आयुष्यातील इतक्या चांगल्या भावना घेऊन जाईल.’ असं दखील तेजश्री म्हणाली.
सध्या सोशल मीडियावर ‘पसंदीदा मर्द’ तुफान ट्रेंड होत आहे. यावर अभिनेत्री म्हणाली, जेव्हा तुम्ही पंचवीशीत असता तेव्हा तुम्हाला सगळं परफेक्ट हवं असतं. आयुष्याचे अनुभव जेव्हा वहीच्या पंधराव्या पानापर्यंत उतरले जातात, तेव्हा लक्षात येतं मला फक्त एक खरा माणूस हवाय. जो माझ्यासोबत खरा वागणार आहे. कमिटेट असणार आहे… बाकी सब हो जाएगा… असं म्हणत तेजस्वी हिने तिच्या आयुष्यात येणारा ‘पसंदीदा मर्द’ कसा असावा सांगितलं आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘मला असं वाटतं दोन चांगली माणसं दोन चांगले लाईफ पर्टनर असणं गरजेचं नाहीये… माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी मला त्या माणसाला दोषी ठरवायचं नाही. ज्या व्यक्तीने मला वेदना दिल्या आहेत, किंवा माझ्यामुळे त्या व्यक्तीला वेदना झाल्या आहेत… त्या व्यक्तीला मला मोठं करायचं नाही.’
हा प्रवास ठरलेला होता. एखादं नातं तुटणं ही फार वाईट गोष्ट आहे. फक्त दोघांसाठी नाही तर, दोन्ही कुटुंबासाठी नातं तुटणं ही वाईट गोष्ट असते.’ असं म्हणत तेजश्रीने भावना व्यक्त केल्या…