‘आणि काय हवं…?’, प्रिया बापट-उमेश कामतकडे चाहत्यांसाठी मोठी ‘गुड न्यूज’!

प्रिया आणि उमेश हे क्युट सेलिब्रिटी कपल अनेकदा रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. या जोडीच्या चाहत्यांसाठी आता एक खास गोड बातमी आहे.

‘आणि काय हवं...?’, प्रिया बापट-उमेश कामतकडे चाहत्यांसाठी मोठी ‘गुड न्यूज’!
प्रिया बापट-उमेश कामत

मुंबई : ‘टाईम प्लीज’ फेम प्रसिद्ध जोडी अर्थात अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील लाडकी सेलिब्रिटी जोडी आहे. रसिक प्रेक्षकांना आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे जितके कौतुक वाटते, तितकेच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचेही वाटते. हे दोघे पडद्यावर रोमँटिक अंदाजात दिसतातच, पण प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरील कौतुकावरून प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे त्यांच्यावरील प्रेम दिसून येते (Marathi celebrity couple umesh kamat and priya bapat share web series good news on social media).

प्रिया आणि उमेश हे क्युट सेलिब्रिटी कपल अनेकदा रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. या जोडीच्या चाहत्यांसाठी आता एक खास गोड बातमी आहे. या जोडीची सुपरहिट रोमँटिक वेब सीरीज ‘आणि काय हवं’चे तिसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचीच घोषणा प्रिया बापटने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन नुकतीच केली. दिग्दर्शक वरुण नार्वेकर या गाजलेल्या सीरीजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.

‘आणि काय हवं?…3’च्या चित्रिकरणाचा शुभारंभ

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

(Marathi celebrity couple umesh kamat and priya bapat share web series good news on social media)

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपण ‘आणि काय हवं?…3’च्या चित्रिकरणाचा शुभारंभ केल्याची पोस्ट टीमच्या फोटोसहित शे्अर केली आहे. या फोटोमध्ये प्रिया बापटसह, उमेश कामत, दिग्दर्शक वरूण नार्वेकर, रणजीत गुगळे, अनिश जोग आणि अमोल साळुंखे हेसुद्धा आहेत्त. प्रियाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सर्वच कलाकार मडळींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे (Marathi celebrity couple umesh kamat and priya bapat share web series good news on social media).

उमेशचं वेब विश्वात पदार्पण

‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजमध्ये प्रियाने ‘जुई’ची, तर उमेशने ‘साकेत’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. लग्नानंतर आयुष्यात होणारे काही बदल, पती-पत्नी या नात्यामध्ये असलेलं प्रेम, मैत्रीचं नात यावर ही सीरीज भाष्य करते.

लग्न झालेल्या शहरी कपल्समध्ये अगदी घरगुती स्वरूपाचे गमतीशीर संवाद कसे होतील, त्यांच्या आयुष्यातल्या गमतीजमती या सीरीजच्या आधीच्या पर्वामध्ये दाखवण्यात आल्या होत्या. खऱ्या आयुष्यातले त्यांचे नवरा-बायकोचे नाते, नात्यातली सहजता या सीरीजमध्ये दिसणार आहे.

उमेश आणि प्रियाने ‘टाईम प्लीज’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यालाही आता सात-आठ वर्ष झाली आहेत. त्यानंतर दोघेही एकत्र आले नव्हते. ‘दादा एक गुडन्यूज आहे’ हे नाटक प्रियाने निर्मित केले असून, उमेशची त्यात महत्त्वाची भूमिका आहे.

(Marathi celebrity couple umesh kamat and priya bapat share web series good news on social media)

हेही वाचा :

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI