Romantic Song : अभिनेता अक्षय वाघमारे पहिल्यांदाच झळकणार रोमँटिक गाण्यात, ‘हळवेसे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अनेक मालिका आणि सिनेमांमधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचं हे पहिलंच रोमँटिक गाणं आहे. 'हळवेसे' असे या गाण्याचे नाव असून हे गाणे जीवन मराठे आणि निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. (Actor Akshay Waghmare to star in romantic song for the first time, 'Halvese' to hit the screens soon)

Romantic Song : अभिनेता अक्षय वाघमारे पहिल्यांदाच झळकणार रोमँटिक गाण्यात, 'हळवेसे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात सहभागी झालेला अभिनेता अक्षय वाघमारेचं (Akshay Waghmare) एक नवं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचं हे पहिलंच रोमँटिक गाणं आहे. ‘हळवेसे’ असे या गाण्याचे नाव असून हे गाणे जीवन मराठे आणि निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केलं आहे.

मुळशी येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगेश अनिल तावर हे गाण्याचे दिग्दर्शक असून अमोल घोडके हे कार्यकारी निर्माते आहेत. राहुल झेंडे यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले असून वैभव लमतुरे हे प्रॉडक्शन हेड आहेत.

 

श्रीनिवास कुलकर्णी आणि मधुसुधन कुलकर्णी यांचे हे तिसरे गाणे असून ‘मन हे वेडे’ व ‘सुख दुःख सारी’ हे दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. आधीच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांच्या पसंतीची पोच पावती मिळाल्याने याही गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल अशी विश्वास निर्माते श्रीनिवास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘हळवेसे’ या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे ‘मन हे वेडे’ गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड करण्यात आल्याचेही श्रीनिवास यांनी सांगितले. हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की ‘या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमँटिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.’ अक्षय व सानियावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.

संबंधित बातम्या

Global Citizen Live Event : प्रियांका चोप्राने शो केला होस्ट, आयफेल टॉवरसमोर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिल्या पोज

Suhana Khan: दिल, दोस्ती, दुनियादारी… मैत्रिणींसोबत ‘सुहाना’ सफर; पाहा सुहाना खानचा शॉर्ट ड्रेसमध्ये नाइट आऊट

Iconic Gold Awards 2021 : सुरभी, दिव्या आणि हीनासह टीव्ही स्टार्सनं रेड कार्पेटवर केली ग्लॅमरस अंजादात एंट्री, पाहा फोटो

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI