‘माझा बाबा…वाहणारा प्रेमाचा झरा थांबला!’ श्रीकांत मोघेंच्या आठवणींना अभिनेत्री प्रिया मराठेकडून उजाळा!

प्रिया मराठे ही श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे याची पत्नी, अर्थात श्रीकांत मोघेंची सून. मात्र, ते माझे सासरे नसून मला माझ्या बाबापेक्षा जवळचे होते, असे प्रियाने म्हटले आहे.

‘माझा बाबा...वाहणारा प्रेमाचा झरा थांबला!’ श्रीकांत मोघेंच्या आठवणींना अभिनेत्री प्रिया मराठेकडून उजाळा!
प्रिया मराठे

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे 6 मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीकांत मोघे यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वाचं एक सोनेरी पान गळून पडलंय. आता त्यांची सून, अभिनेत्री प्रिया मराठे त्यांच्या आठवणीत भावूक झाली असून, तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘माझा बाबा…वाहणारा प्रेमाचा झरा थांबला!’, असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे (Actress Priya Marathe Share emotional post for father in law late Shrikant moghe).

जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंच्या आठवणीत प्रियाने ही भावूक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया मराठे ही श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे याची पत्नी, अर्थात श्रीकांत मोघेंची सून. मात्र, ते माझे सासरे नसून मला माझ्या बाबापेक्षा जवळचे होते, असे प्रियाने म्हटले आहे.

पाहा प्रियाची पोस्ट :

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Marathe (@priyamarathe)

(Actress Priya Marathe Share emotional post for father in law late Shrikant moghe)

इतकं प्रेम क्वचितच कोणी माझ्यावर केलं असेल…

प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सासरे श्रीकांत मोघे यांचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझा बाबा! इतकं प्रेम, माझा नवरा सोडल्यास, क्वचितच कोणी माझ्यावर केल असेल.. ‘सासरे’ फक्त म्हणायला, होता तो मला बाबा पेक्षाही जवळचा. ‘माझं पीयूडं’, ‘माझं लाडकं’ अशी हाक मारत दोन्ही हात पसरून, मला मिठीत घ्यायचा. प्रयोग संपवून आले असले की ‘आज किती बुकिंग होतं, प्रयोग कसा झाला, पुढचा कुठे आहे’ असे सगळे प्रश्न विचारायचा. बाबा आणि मुलाचं हे असं नातं ही मी पहिल्यांदाच पाहिलं. शंतनु बाबाचे गालगुच्चे घ्यायचा, त्याला प्रेमानी अक्षरशः चुर्गळून टाकायचा आणि ते बाबाला अत्यंत सुख देऊन जायचं’, असे म्हटले आहे (Actress Priya Marathe Share emotional post for father in law late Shrikant moghe).

तरुणानांही लाजवेल असा उत्साह

पुढे प्रिया लिहते, ‘गेली काही वर्ष तो व्हील चेअर वर होता पण तरी त्याच्या चेहेऱ्यावर मी कधीच, एका क्षणासाठी सुद्धा, उदासीनता नाही पाहिली, उलट आम्हाला लाजवेल इतका उत्साहच कायम पहिला. ‘मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे’ हे धोरण मानून कशातच तो फार अडकला नाही. हा वाहणारा प्रेमाचा धबधबा थांबला.. पण माझ्या कुटुंबाच्या मनात त्याचं प्रेम आणि रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यात त्याचा ज्वलंत अभिनय कायमच जिवंत राहील.’ सध्या प्रियाची ही भावून पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. तर, प्रियाची ही पोस्त वाचून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे.

(Actress Priya Marathe Share emotional post for father in law late Shrikant moghe)

हेही वाचा :

‘शितली’ची काकी झालीय समरची ‘नीलम’, मंजुषाचा ट्रान्स्फरमेशन अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल ‘वा!’

PHOTO | पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं ‘गोरी मेम’चं सौंदर्य, पाहा नेहाचे सुंदर फोटो…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI