महाराष्ट्राची क्रश वैदेही परशुरामीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ अभिनेत्यासोबत दिसणार मोठ्या पडद्यावर
Actress Vaidehi Parshurami New Movie ek don tin char : अभिनेत्री वैदेही परशुरामी हिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून वैदेही नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वैदेहीसोबत कोण मोठ्या पडद्यावर दिसणार? वाचा सविस्तर...

महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री वैदेही परशुरामी… वेदेही वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसते आताही वैदेही एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘एक दोन तीन चार’ हा तिचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात वैदेही आधीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसेल. वरूण नार्वेकर दिग्दर्शित, जिओ स्टुडिओजच्या ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे. यात वैदेही गर्भवती असल्याचं दाखवण्यात आलं आहे. वैदेहीचं हे पात्र स्त्री मनाचा आरसा दाखवतं. वैदेही साकारत असलेलं सायली हे पात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.
सिनेमाच्या टीझरमध्ये काय?
अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जातं हे खरं मानता येईल कदाचित! होय. कारण नुकताच ‘एक दोन तीन चार’ या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय. या जोडप्याच्या आयुष्यातला हा अनोखा ट्विस्ट काय आहे. याची छोटीशी झलक आपल्याला टीझर मधून कळते. आता हा हॅपिनेस चा बुम्म त्यांच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवणार आहे ,हे आपल्याला येत्या 19 जुलै लाच समजेल.
View this post on Instagram
‘एक दोन तीन चार’ या चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिलीय. या सिनेमाची कधीपासून वाट पाहातोय. फायनली हा सिनेमा आलाय, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. वाट बघतोय सिनेमा रिलिज होण्याची, असं एका सिनेरसिकाने म्हटलंय. तर काहीही हं… अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.
सिनेमात कोण- कोण कलाकार?
‘एक दोन तीन चार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा दिसणार आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांच्या साहाय्याने ‘एक दोन तीन चार’ हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा 19 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
