AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urmila Nimbalkar | ‘उर्मिला आणि एक गोंडस बाळ…’, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो!

मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते.

Urmila Nimbalkar | ‘उर्मिला आणि एक गोंडस बाळ...’, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा पहिला फोटो!
Urmila Nimbalkar
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री-युट्युबर उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद लुटत आहे. अभिनेत्री उर्मिला सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांना आणि प्रेक्षकांना अनेक किस्से आणि गोष्टी देखील शेअर करत असते. नुकताच आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. अर्थात तिने आपल्या मुलाचा पहिला वहिला फोटो शेअर केला आहे.

उर्मिला निंबाळकर हिने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती आपल्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त आहे. नुकताच तिने आपल्या बाळाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोसोबतच तिने एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे.

पाहा उर्मिलाची पोस्ट :

‘उर्मिला आणि एक गोंडस बाळ! बाळाबरोबरचा पहिला फोटो, मला कधी कधी विश्वासच बसत नाही, ही गुंडाळलेली अळी हा एक बरीटो, माझा आहे!’, असं छानसं कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. यात तिच्या बाळाचा चेहरा मात्र दिसत नाहीये. गुंडाळलेले बाळ कुशीत असताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद स्पष्टपणे झळकत आहे.

उर्मिलाची कारकीर्द

मराठीसह हिंदी मालिका विश्वात चमकणारी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आता युट्युबर म्हणून देखील प्रसिद्ध झाली आहे. उर्मिलाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने तिच्या प्रत्येक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘दुहेरी’ या मालिकेत तिने ‘मैथिली’ ही प्रमुख भूमिका केली होती. तसंच, तिने ‘दिया और बाती हम’, ’मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याबरोबरच तिने संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी देखील उत्तम पेलली.

अभिनेत्रीवर कधी काळी आला होता चोरीचा आळ!

करिअरच्या सुरुवातीच्या काळात उर्मिलाने बराच संघर्ष केला. एके काळी ती ज्या मालिकेत काम करत होती, त्या मालिकेच्या नायिकेचा मेकअप चोरीला गेल्यावर केवल उर्मिलाकडे महागडी लिपस्टिक दिसल्याने तिच्यावर संशय घेण्यात आला होता. एक तो दिवस आणि एक आजचा दिवस जेव्हा उर्मिलाला तिच्या याच आवडत्या लिपस्टिक ब्रँडने त्यांच्या नव्या प्रोडक्टचं खास लाँचिंग करण्याची विनंती केली आहे.

हा प्रवास माझ्यासाठी अभिमानाचा!

या आठवणीची पोस्ट शेअर करताना उर्मिलाने लिहिले की, ‘परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच. पण, माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!’, असं उर्मिला निंबाळकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.

हेही वाचा :

Bigg Boss OTT | अंतिम फेरीच्या जवळ पोहचून नेहा भसीन झाली बेघर, ‘या’ पाच स्पर्धकांमध्ये होणार तगडी टक्कर!

Raj Kundra Case | मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राविरोधात दाखल केले आरोपपत्र, शिल्पा शेट्टी होणार साक्षीदार, 1500 पानांत लेखाजोखा…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.