वेळ विचारण्याचा बहाणा, पार्कात बाकड्यावर बसलेल्या सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार!

मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरांनी पळ काढल्याची घटना नुकतीच घडली आहे.

वेळ विचारण्याचा बहाणा, पार्कात बाकड्यावर बसलेल्या सविता मालपेकरांची सोनसाखळी खेचून चोर पसार!
सविता मालपेकर
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 5:47 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरांनी पळ काढल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क सारख्या गजबजलेल्या ठिकाणी बाकड्यावर बसलेल्या अभिनेत्रीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोरट्यांनी पळ काढल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

चोर वेळ विचारण्याच्या बहाण्याने सविता मालपेकर बसलेल्या बाकड्याजवळ आले. वेळ विचारण्याचा बहाणा करत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून तिथून पळ काढला. चोरट्यांसोबत झालेल्या खेचाखेचीत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान शिवजीपार्क पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तत्पर करत आहेत.

नेमकं काय झालं?

सोमवारी रात्री नऊ वाजता शिवाजी पार्क येथे फेरी मारून तेथील एका कट्ट्यावर अभिनेत्री सविता मालपेकर बसल्या असता, एक माणूस वेळ विचारण्यास आला, मात्र वेळ सांगण्यास सविता मालपेकर यांनी नकार दिला. त्यानंतर पुन्हा मागे फिरून त्याने सविता मालपेकर यांच्या गळ्यातील चेन खेचली, या झटापटीत त्यांचे कपडे फाटले.

सादर प्रकार घडत असताना सविता मालपेकर यांनी आरडाओरड देखील केली. आजुबाजूचे लोक जमले, तोवर चोरटा बाईकवरून फरार झाला होता. पोलीस स्टेशनचे अधिकारी काही क्षणातच घटनास्थळी आले, सर्व माहिती घेऊन राजा बढे चौकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याची ओळखही पटली. हा चोरटा माहीमचा निवासी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही गरजेचा!

या घटनेबाबत बोलताना सविता मालपेकर यांनी सांगितले की, शिवाजी पार्क हे नेहमीच गर्दीचे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी सुरक्षेची यंत्रणा नाही. सीसीटीव्ही फक्त मुख्य प्रवेशद्वाराजवळच आहे. सर्व गेटवर सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. येथे ज्येष्ठ नागरिक, छोटी मुले महिला यांचा वावर असतो. अशा ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटिव्ही यंत्रणा असणे आवश्यक आहे.

कोण आहेत सविता मालपेकर?

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

‘हाहाकार’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘गड्या आपला गाव बरा’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’, ‘नटसम्राट’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘शिकारी’, ‘मी शिवाजी पार्क’, ‘7 रोशन व्हिला’ अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत.

(Chain snatching incident happened with veteran Marathi actress Savita Malpekar at Shivaji park)

हेही वाचा :

Raj Kundra arrest : राज कुंद्रांचा ‘डर्टी पिक्चर’ कसा उघडा पाडला? मुंबई पोलिसांनी A टू Z सांगितलं

टेरेसवर गाणं ऐकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, वर्ध्यात तरुणाला सश्रम कारावासाची शिक्षा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.