प्रिया बेर्डेंपाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री राष्ट्रवादीत

अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.

प्रिया बेर्डेंपाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री राष्ट्रवादीत
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 12:19 PM

पुणे : प्रख्यात चित्रपट अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यापाठोपाठ सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. (Marathi Actress Savita Malpekar to join NCP)

सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

कोण आहेत सविता मालपेकर?

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. ‘काकस्पर्श’ सिनेमात आत्याच्या भूमिकेसाठी त्यांनी डोक्यावरील संपूर्ण केस काढले होते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी नाटक-मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत.

हाहाकार, कुंकू लावते माहेरचं, गड्या आपला गाव बरा, स्वामी पब्लिक लिमिटेड, नटसम्राट, मुळशी पॅटर्न, शिकारी, मी शिवाजी पार्क, 7 रोशन व्हिला अशा सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘हथियार’ या हिंदी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन सृष्टीतील नाटक, रंगमंच कामगार, कलाकार यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांना उभं करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेनेही मदत करायचं ठरवलं. 1 कोटी 20 लाख रुपयांच्या जमलेल्या मदत निधीचे वाटप नियामक मंडळातल्या सदस्यांना डावलून झाल्याने 60 पैकी 15 पदाधिकाऱ्यांनी नाराजी नोंदवली होती. हा ईमेल परिषदेचे विश्वस्त शरद पवार, शशी प्रभू, रवी बापट यांना पाठवला होता. या 15 पदाधिकाऱ्यांमध्ये सविता मालपेकर यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : Priya Berde joins NCP | पवारांच्या कार्याने प्रभावित, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

प्रिया बेर्डे यांच्यासह कलाकारांच्या फौजेने काही दिवसांपूर्वी पुण्यात जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार आहे.

प्रिया बेर्डे यांच्या मागण्या

राज्य शासनाच्या जाहिरातीमध्ये मराठी कलाकारांना स्थान द्यावे ज्येष्ठ कलावंताच्या मानधनात वाढ करावी मालिकांची प्रत्येक शिफ्ट आठ तासांचीच असावी मालिका कलाकारांना 90 ऐवजी तीस दिवसात मानधन मिळावे

(Marathi Actress Savita Malpekar to join NCP)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.