De Dhakka 2 Trailer: ”मराठी माणसाला कमी लेखायचं नाय”, ‘दे धक्का 2’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

आता 'दे धक्का 2'मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कारने घेतली आहे आणि चित्रपटाचं कथानक लंडनमध्ये घडतंय. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, संजय खापरे तसंच सहकलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत.

De Dhakka 2 Trailer: ''मराठी माणसाला कमी लेखायचं नाय, 'दे धक्का 2'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?
'दे धक्का 2'चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 10:32 AM

काही चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडत नाहीत तर चाहत्यांच्या मनावरही छाप पाडण्यात यशस्वी होतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘दे धक्का’. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आणि आता या चित्रपटाचा सीक्वेल ‘दे धक्का 2’ (De Dhakka 2) येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तर या चित्रपटाच्या टीझरला अल्पावधीत दोन दशलक्ष व्ह्यूज मिळाले. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं होतं. मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम (Shivaji Satam), मेधा मांजरेकर, संजय खापरे आणि सक्षम कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट महाराष्ट्रातील एका खेडेगावातील एका आगळ्यावेगळ्या कुटुंबाच्या ऑटो-रिक्षामधील प्रवासाविषयी होता.

आता ‘दे धक्का 2’मध्ये ऑटो-रिक्षाची जागा कारने घेतली आहे आणि चित्रपटाचं कथानक लंडनमध्ये घडतंय. या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सक्षम कुलकर्णी, संजय खापरे तसंच सहकलाकार गौरी इंगवले, प्रवीण तरडे, विद्याधर जोशी आणि आनंद इंगळे हे आहेत. ‘दे धक्का 2’चं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. महेश मांजरेकर यांनी कथा आणि पटकथा लिहिली आहे तर संवाद लेखन गणेश मतकरी यांनी केलं आहे. करण रावत हे सिनेमॅटोग्राफर आहेत तसंच चित्रपटाचं एडिटिंग सतीश पडवळ आणि नीलेश गावंड यांनी केलं आहे.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

‘दे धक्का 2’मधील गाणी संगीतकार हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केली आहेत तर गीतकार मंदार चोळकर आणि नेहा शितोळे हे आहेत. आघाडीचे गायक अवधूत गुप्ते, वैशाली माडे, शमिका भिडे, रिया भट्टाचार्य या चित्रपटाला लाभले आहे. सिनेमाचे संगीत ‘व्हिडिओ पॅलेस’ ने प्रदर्शित केले आहेत. ‘दे धक्का 2’ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी केली आहे. निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेझ पटेल यांनी सह निर्मिती केली आहे तसेच असोसिएट निर्माते कर्मिका टंडन आणि विशिष्टा दुसेजा हे आहेत .

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.