आनंद शिंदे राजकारणात आले, राजकीय पक्षही स्थापन केला; तुम्हाला माहीत आहे का?

गायन क्षेत्रात यशाचं प्रचंड शिखर गाठल्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी राजकारणात एन्ट्री केली. (do you know anand shinde formed new political party?)

आनंद शिंदे राजकारणात आले, राजकीय पक्षही स्थापन केला; तुम्हाला माहीत आहे का?
आनंद शिंदे, पार्श्वगायक
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 7:47 PM

मुंबई: गायन क्षेत्रात यशाचं प्रचंड शिखर गाठल्यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक आनंद शिंदे यांनी राजकारणात एन्ट्री केली. राजकारणात आल्यानंतर त्यांनी राजकीय पक्षाची स्थापनाही केली. राजकारणात त्यांना यश आलं नाही. पण आजही ते सामाजिक चळवळ करत असतात. त्यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष त्याचाच हा किस्सा… (do you know anand shinde formed new political party?)

आणि राजकीय पक्षाची स्थापना झाली…

मी पहिल्यापासून राजकारणात आहे. गाण्यातूनच माझी चळवळ सुरू असते. फक्त स्टेजवर भाषण देत नाही, असं ते सांगतात. आम्ही मनोज संसारे यांच्यासोबत एक अभियान सुरू केलं होतं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्थिकलश आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरवला होता. त्यातून आमच्या पक्षाची निर्मिती झाली. जे बाबासाहेबांना मानणारे लोकं आहेत, जे स्वाभिमानी लोकं आहेत. त्यांचा तो पक्ष असेल. त्यातून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे नाव मीच दिलं होतं. केवळ बनवायचा म्हणून आम्ही पक्ष स्थापना केला नव्हता, असं आनंद शिंदे यांनी सांगितलं. आमच्या पक्षात कोणीही अध्यक्ष नाही, कोणी सरचिटणीस नाही, सर्व कार्यकर्ते म्हणूनच राहणार असल्याचं आम्ही ठरवलं होतं.

बाळासाहेबांनी हाक द्यावी

बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत. त्यांनी हाक द्यावी, सर्वच त्यांच्याकडे येतील. त्यांनी सर्वांना बोलावलं पाहिजे. सन्मानाने बोलवलं पाहिजे, असं शिंदे मागे एकदा म्हणाले होते. मात्र, आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेचं सदस्यत्व मिळण्याची शक्यता आहे.

सात कोटी लोकांना दीक्षा पण सात हजारही मते नाहीत

यावेळी आनंद यांनी आंबेडकरी चळवळीचं विदारक चित्रंही मांडलं. बाबासाहेबांनी त्या काळात सात कोटी लोकांना दीक्षा दिली. आज चळवळीची अवस्था इतकी वाईट आहे की रिपब्लिकन उमदेवारांना सात हजार मतेही मिळत नाहीत, अशी खंतही ते व्यक्त करतात.

मुलाचं सामाजिक कार्य

आनंद शिंदे यांच्या गाण्याचा वारसा जसा आदर्श शिंदेंकडे आला आहे. तसाच आनंद यांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांचा दुसरा मुलगा उत्कर्ष शिंदे यांच्याकडे आला आहे. उत्कर्ष यांनी स्वरसम्राट प्रल्हाद चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला. राज्यातील अनेक भागात या ट्रस्टचं काम सुरू आहे. पूर आलेल्या ठिकाणी जाऊन नामवंत डॉक्टरांच्या माध्यमातून उपचार केले जातात. त्याशिवाय दरवर्षी 125 अंध मुलांना दत्तक घेऊन त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली जाते. तसेच रस्त्यावरील लोकांनाही अन्नाचे वाटप केलं जाते. (do you know anand shinde formed new political party?)

राजकारणातही ‘शिंदेशाही बाणा’

आनंद शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीकडून त्यांना विधानपरिषदेत पाठवण्यात येणार असून राज्यपालांकडे त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे विधीमंडळातही आता ‘खणखणीत’ शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता आहे. शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे याआधीही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आनंद शिंदेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर लांबलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतून शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. (do you know anand shinde formed new political party?)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील पहिलं कोळीगीत विठ्ठल उमप यांनी गायलं हे माहीत आहे का?; कधी आणि कोणतं? वाचा!

विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले?; वाचा, लोकशाहीराचा किस्सा!

रेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय?

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

(do you know anand shinde formed new political party?)

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....