AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फौजी’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका

Fauji Movie : सैनिकांचं जीवन कसं असतं? त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात? यावर आधारित एक सिनेमा येतोय. ‘फौजी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. अभिनेता सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड या सिनेमात दिसणार आहेत. 30 ऑगस्टला ‘फौजी’चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. वाचा सविस्तर...

'फौजी' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका
फोजी सिनेमाImage Credit source: tv9
| Updated on: Aug 11, 2024 | 7:12 PM
Share

स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या 30 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे. शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमात कोण- कोण कलाकार?

सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, शाहबाज खान, टिनू वर्मा, सिद्वेश्वर झाडबुके, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार सुनील गोडबोले, रोहित चव्हाण, प्रग्या नयन, जान्हवी व्यास, कल्याणी नदकिशोर, मंजुषा खत्री, जयंत सावरकर, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात आहेत. आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मीती केल्याचे चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे यांनी सांगितले.

सिनेमा कधी रिलीज होणार?

‘फौजी’ या चित्रपटाच्या सहनिर्मात्या सौ.स्वप्नजा विश्वनाथ नाथ आहेत. विशेष कार्यकारी निर्माता प्रथमेश बिल्डर्स अँड डेवलोपर्स, शिवाजी घमाजी दडस तर विशेष निर्मिती सहकार्य विष्णुपंतभाऊ नेवाळे यांचे आहे. अनमोल निर्मिती सहकार्य सतीश नाझरकर, डॉ.शंकर तलबे,उद्धव गावडे, अशोक गाढे, राजेश चव्हाण, गणेश गुंजाळ, एस. पी.गावडे, ज्योतीराम घाडगे, कुमार परदेशीं, राजेंद्र कर्णे यांचे आहे. 30 ऑगस्टला ‘फौजी’ चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉटबॉय ते निर्माता-दिग्दर्शक असा संघर्षमय प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा, तर संकलन विश्वजीत यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. संगीत राजेश बामुगडे, बाबा चव्हाण, सूरज कुमार तर पार्श्ववसंगीत उमेश रावराणे, सूरज कुमार यांचे आहे. शान, वैशाली माडे, उर्मिला धनगर, कविता राम यांनी चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज दिला आहे. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील, कौशल सिंग यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती प्रमुख महेश चाबुकस्वार तर वितरणाची जबाबदारी ए.ए फिल्म्सने सांभाळली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.